कोल्हापूर : प्रतिनिधी : राजस्थान बनस्थळी विद्यापीठ न येथे सुरू असलेल्या पश्चिम विभागीय विद्यापीठ क्रिकेट ( महिला) स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर संघ सलग पाचव्या वर्षी ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी संघ पात्र झाला. शिवाजी विद्यापीठ संघाने रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ संघाचा १५ धावांनी पराभव करून विजय प्राप्त करत पात्रता मिळवली. (Shivaji University women’s cricket team qualifies)
शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी सर, प्रभारी प्र. कुलगुरू डॉ. ज्योती जाधव मॅडम, कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे सर, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांचे खेळाडूंना प्रोत्साहन लाभले तर या संघासोबत संघ व्यवस्थापक प्रा. सुरेश फराकटे आणि प्रा. देवदत्त महात्मे निवड समिती चे चेअरमन प्रा. सुचय खोपडे, निवड समिती सदस्य प्रा. प्रकुल म. पाटील-मांगोरे, प्रा. श्वेता परुळेकर यांचे मार्गदर्शन लाभले. (Shivaji University women’s cricket team qualifies)
विजयी संघ असा
क्रिशी ठक्कर ( कर्णधार ) अक्षता नरतवडेकर, सानिका पाटील, रसिका शिंदे, सृष्टी पोवार, ऋतुजा घबक, स्नेहल टकले, संस्कृती राठोड, अर्पिता नायकवडी, आकांशा राजने, वैदेही जोशी, श्रेया जेऊर, अनुजा खंडागळे, ऋतिका चतुरे, मिसबा सय्यद, प्राजक्ता घाटगे. (Shivaji University women’s cricket team qualifies)