सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एकांकिका स्पर्धा

Marathi one-act play competition

मुंबई  : राज्य शासनाच्या सांकृतिक कार्य विभागामार्फेत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठा एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले आहे.  ही  स्पर्धा यावर्षी चार विभागांतून साकार होत आहे. या स्पर्धेतून मराठी एकांकिका चळवळीत नवा इतिहास घडणार असल्याचा विश्वास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे. मराठी रंगभूमीतील नवोदित कलाकारांना व्यासपीठ देणे, एकांकिका चळवळीला नवसंजीवनी देणे आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा वारसा अधिक समृद्ध करणे, हाच या भव्य स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी सांगितले.

ही एकांकिका स्पर्धा यावर्षीपासून फक्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली आहे. कोकण विभागातील स्पर्धेचे १९ ते २३ जानेवारी, २०२६ या कालावधीत यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा येथे आयोजन करण्यात येत आहे. याचबरोबर ही स्पर्धा पुणे, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या चार प्रमुख विभागांत प्राथमिक फेरीच्या स्वरुपात घेण्यात येणार आहे. राज्यभरातून सहभागी होणाऱ्या नाट्यसंघांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. (Marathi one-act play competition)

 प्राथमिक फेरीत सादरीकरण करणाऱ्या संघांमधून प्रत्येक विभागातून ५ उत्कृष्ट संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात येणार असून, अशा प्रकारे एकूण २० संघ अंतिम टप्प्यात पोहोचणार आहेत.  विशेष बाब म्हणजे ही संपूर्ण प्राथमिक फेरी निशुल्क ठेवण्यात आली आहे. जास्तीत जास्त नाट्यसंघांनी व रसिक प्रेक्षकांनी या एकांकिका स्पर्धेतील नाटकांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे. (Marathi one-act play competition)

Related posts

२८ लाखांची लाच घेताना महिला पोलिस अधिकारी जाळ्यात

सासूने मारला जावयाच्या घरातील साडेसोळा लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

प्रायश्चित म्हणून फडणवीसांनी राजीनामा द्यावा : हर्षवर्धन सपकाळ