Shinde criticizes BJP in Dahanu meeting : रावणाची लंका अहंकारामुळे जळाली ; एकनाथ शिंदेची भाजपवर टीका

Shinde criticizes BJP in Dahanu meeting

डहाणू : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू आहे. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्हयात शिवसेना शिंदे गटातील नेत्यांना भाजपने प्रवेश दिल्याने उपमुख्यमंत्री शिंदे नाराज झाले आहेत. आज डहाणू येथे झालेल्या प्रचारसभेत भाजपचे नाव न घेता एकनाथ शिंदे यांनी रावणाची लंका अहंकारामुळे जळाली. एकाधिकारशाही मोडून काढणार, असा इशारा दिला . (Shinde criticizes BJP in Dahanu meeting)

उप मुख्यमंत्री शिंदे यांनी आज शनिवारी पालघर जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीसाठी प्रचार सभा घेतल्या. पालघर, जव्हार आणि डहाडू येथे प्रचारसभा घेतल्या. डहाणू नगरपालिका निवडणुकीत  शिवसेना विरुद्ध भाजप असा थेट सामना होत आहे. डहाणूला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच येथील एकाधिकारशाही आणि अहंकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, डहाणूमध्ये आपण सगळे एकाधिकारशाही विरोधात एकत्र आलेले आहोत. अहंकाराच्या विरोधात एकत्र आलेले आहोत. रावणाला अहंकार होता, अहंकारामुळे रावणाची लंका जळून खाक झाली. आता तुम्हाला एकाधिकारशाही आणि अहंकार संपवायचा आहे.
अशी टीका उप मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपचे नाव न घेता केली. (Shinde criticizes BJP in Dahanu meeting)

एकनाथ शिंदे यांनी उद्योग वाढीस प्राधान्य, स्थानिक मच्छीमारांचे प्रश्न सोडवणे, जुन्या घरांचे प्रश्न मार्गी लावणे, शहरातील युनिफाइड डीसीपीआरला मंजुरी देणे, नवीन उद्याने विकसित करणे, आपला दवाखाना, नगर परिषदेच्या इमारतीला निधी, प्रदूषणमुक्त उद्योग धोरण राबवणे, रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. (Shinde criticizes BJP in Dahanu meeting)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

विद्यार्थी आंदोलनात पोलिसांकडून एके-४७ मधून फायरिंग