कोल्हापूर : प्रतिनिधी : शिक्षकाने शाळेतील विद्यार्थीची छेड काढल्यानंतर संतप्त जमावाने शिक्षकाला बेदम चोप दिला. कागल तालुक्यातील सेनापती कापशी गावातील शाळेत ही घटना घडली. या शिक्षकाला अटक करुन निलंबित करावे, अशी सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. (Teacher brutally beaten)
या घटनेतील शिक्षक सेनापती कापशी येथील शाळेत गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. यापूर्वीही त्याने मुरगुड येथील विद्यालयात असा प्रकार केला होता. तेव्हा संबधित शिक्षकांला पालक आणि जमावाने बेदम चोप देऊन मुरगुड शहरात धिंड काढली होती. पण याच शिक्षकाने सेनापती कापशी येथील शाळेत पुन्हा असाच प्रकार केला. संबधित विद्यार्थीनीची अश्लील शब्दात छेड काढली. संबधित घटना विद्यार्थिनीने घरी सांगितल्यानंतर आज तिचे नातेवाईक शाळेत आले. त्यानंतर जमावाने बेदम चोप दिला. यावेळी शाळेत मोठा जमाव जमला होता. शिक्षकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जमावाने केली होती. (Teacher brutally beaten)
दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच मुंबई येथे विधानसभा अधिवेशनात व्यस्त असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेत शाळा प्रशासनाशी संपर्क साधला. संबधित शिक्षकाला अटक करा, त्याला निलंबित करा, अशी सूचनाही केली. (Teacher brutally beaten)