Sapkal slams CM : हनीट्रॅपचे धागेदारे समृद्धीच्या भ्रष्टाचारापर्यंत : सपकाळ यांचा आरोप

Sapkal slams CM

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत हे सत्य आहे. त्याचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचलेले असून तो  उघड होऊ नये म्हणून  सरकारकडून तो  दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी (१९ जुलै) केला. (Sapkal slams CM)

पावसाळी अधिवेशनात सरकारने जनतेच्या तोंडाला केवळ पाने पुसण्याचे काम केले असल्याची टीकाही त्यांनी केली.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाने जनतेला काय दिले तर ‘राजा उदार झाला आणि हाती भोपाळा दिला’, असेच म्हणावे लागेल. राज्यात गुन्हेगारी वाढली आहे, महिला सुरक्षित नाहीत, ड्रग्जचा सुळसुळाट जोरात सरु आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई, कर्जमाफी, पीकविमा, बेरोजगारी यातील एकाही प्रश्नावर ना सविस्तर चर्चा झाली ना काही निर्णय. (Sapkal slams CM)

मारामारीच्या प्रकाराला मुख्यमंत्रीच जबाबदार

हे अधिवेशन लक्षात राहिले ते फक्त विधानभवनाच्या इमारतीत झालेल्या तुंबळ हाणीमारीच्या घटनेने… रस्त्यावरील गुंड, मवाली आता थेट विधानभवनात घुसले आणि त्याला फक्त आणि फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच जबाबदार आहेत. त्याला पायश्चित म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सपकाळ यांनी केली.

पेरले तेच उगवले

ते म्हणाले,’ विधिमंडळ अथवा संसदेत जनता आपले लोकप्रतिनिधी पाठवते ती त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पण अलिकडे हे चित्र बदलत चालले आहे. कालपर्यंत जे रस्त्यावर होत होते ते आज लोकशाहीच्या पवित्र मंदिरात घडले. भाजपाने ही नवी संस्कृती जाणीवपूर्वक आणली आहे. अक्कलकोटमध्ये प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या मकोकाच्या गुंडाला भाजपाचे नेतेच ‘भिवू नकोस मुख्यमंत्री तुझ्या पाठीशी आहेत’ असे सांगत आहेत. तर आमदार निवासाच्या कँन्टीमध्येही एका आमदाराने असेच ‘डब्लूडब्लूएफ’ केले. आका, कोयता गँग आता जुने झाले. भाजपाने जे पेरले तेच उगवले आहे. असा हल्लाबोल सपकाळ यांनी केला. (Sapkal slams CM)

समृद्धीत २० हजार कोटींचा भ्रष्टाचार

राज्यातील काही अधिकारी व मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकले आहेत हे सत्य आहे. मुख्यमंत्री असे काही घडलेले नाही असे म्हणत असले तरी ते नेहमीप्रमाणे खोटे बोलत आहेत. या हनीट्रॅपचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील २० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचारापर्यंत पोहोचले आहेत. हा घोटाळा उघड होऊ नये म्हणून तो दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, फडणवीस जे बोलले ते धादांत खोटे आहेत, असा आरोपही सपकाळ यांनी केला.

‘जनसुरक्षा’ला विरोधच

जनसुरक्षा कायद्यावर ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून यावर हरकत घेतलेली असून काँग्रेसचा या विधेयकाला विरोध आहे. या विधेयकासाठी नियुक्त केलेल्या समितीतही अनेक आक्षेप घेण्यात आले आहेत. बजरंग दल, आरएसएस या संघटनाही या कायद्याच्या कक्षेत येतात का?, असा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार काही बोलत नाहीत, आमचा या विधेयकाला विधिमंडळाच्या आत व बाहेरही विरोधच राहील असे काँग्रेस  सांगितले.

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर