Sandesh Shete : जुगाराचा गुन्हा नोंद न करण्याची ७० हजार लाचेची मागणी

Sandesh Shete

कोल्हापूर : प्रतिनिधी : जुगाराचा गुन्हा नोंद न करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल आणि त्याच्या पंटरविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हुपरी पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्स्टेबल संदेश आनंदा शेटे (वय ३५, रा. नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) आणि रणजीत आनंदा बिरांजे (३८ रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले) या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पंटर बिरांजे याला पोलिसांनी अटक केला आहे. (Sandesh Shete)

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. तक्रारदार आणि त्यांचे मित्र जुगार खेळत असताना हुपरी पोलिस ठाण्यातील पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्यावर गुन्हा नोंद न करण्यासाठी पोलिस कॉन्स्टेबल संदेश शेटे याने तक्रारदारांकडे एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यानंतर लाचेच्या रक्कमेत तडजोड करण्यात आली. शेटे याने ७० हजार रुपये लाच पंटर रणजीत बिरांजेकडे देण्यास सांगितले. (Sandesh Shete)

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची खातरजमा करुन सापळा रचला. आज शनिवारी पंटर रणजित बिरांजेला ७० हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडले. पोलिसांनी शेटे आणि बिरांजे याच्याविरोधात हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

पोलिस उप अधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन पाटील, पोलिस कॉन्स्टेबल संदीप पवार, कृष्णा पाटील, गजानन कुराडे यांनी कारवाई केली. (Sandesh Shete)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर