Samruddhi Project: आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय : मुख्यमंत्री

Samruddhi Project

इगतपुरी : “आम्ही तिघेही एकत्र गाडी चालवत आहोत, काळजी करू नका. आम्हाला एकमेकांच्या गाडीत बसायची सवय आहे. आमची गाडी एकदम छान चालली आहे. तिघेही तीन शिफ्टमध्ये चालवत आहोत, ” अशी मिश्कील टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (५ जून) केली. (Samruddhi Project)

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याच्या म्हणजेच इगतपुरी ते आमणे (७६ किमी) दरम्यानच्या लोकार्पणाचा सोहळा फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हेही उपस्थित होते.

यावेळी तिघांनीही एकाच गाडीतून समृद्धी महामार्गावरून प्रवास केला. यावेळी गाडीचे स्टेअरिंग उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हाती घेतले होते. या प्रवासानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही टिप्पणी केली. (Samruddhi Project)

मुंबई-नागपूर अंतर १६ तासांऐवजी केवळ आठ तासात पार करता यावे यासाठी एमएसआरडीसीने ७०१ किमी लांबीचा हा प्रकल्प हाती घेतला होता. सुमारे ५५ हजार कोटी रुपये खर्चाचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा हा अंतिम टप्पा पूर्ण झाला आहे. राज्यातील १० जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांमधून जाणाऱ्या सहा पदरी महामार्गाचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात आले आहे.

शक्तीपीठ मराठवाड्याचे चित्र बदलणार

समृद्धी महामार्गासारखाचा शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या जीवनात बदल घडवणार आहे. तो मराठवाड्याचे चित्र बदलेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या लोकार्पण कार्यक्रमात व्यक्त केला. महायुतीच्या कार्यकाळातच या महामार्गाचे उद्घाटन होत असल्याचा आनंद आहे. आता अशाच प्रकारचा शक्तीपीठ महामार्ग पुढच्या टप्प्यात करायचा आहे. हा शक्तीपीठ महामार्ग संपूर्ण मराठवाड्याचे चित्र बदलणारा तसेच मराठवाड्यात आर्थिक बदल घडवणारा असेल, असे ते म्हणाले. तसेच त्याचे कामही लवकरच सुरू होईल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :
लिव्ह इन रिलेशनशीप खुनाच्या गुन्ह्यातील संशयिताची आत्महत्या
सुपेकरांनी १२०० रुपये काजूकतली कैद्यांना खायला दिली

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर