कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रथमच महायुतीचा झेंडा फडकवल्यानंतर आता महापौरपदाच्या इतिहासात प्रथमच महापौर भाजपचा विराजमान होणार आहे. भाजपने महाराणी ताराराणी यांच्या करवीरनगरीत महापौरपदाच्या उमेदवारीचा मान रुपाराणी निकम यांना दिला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. शुक्रवारी ६ फेब्रुवारी रोजी महापौर आणि उप महापौरपदाची निवडणूक होणार आहे. उप महापौरपदाची माळ जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक अक्षय जरग यांना संधी मिळणार आहे. (Ruparani Nikam nominated for the mayoral post)
महापौर आणि उप महापौरपदाचा फॉर्म भरण्यापूर्वी महापौरपदाचा मान भाजपकडून कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज सोमवारी सकाळी नागाळा पार्कातील भाजपच्या कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांच्या बैठकीत महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांची घोषणा केली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजप प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहूल चिकोडे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव उपस्थित होते. (Ruparani Nikam nominated for the mayoral post)
महानगरपालिकेत भाजपचे २६, शिवसेनेचे १५, आणि राष्ट्रवादीचे चार असे ४५ नगरसेवक निवडून आले आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षानेही महायुतीला पाठिंबा दिला आहे. जनसुराज्यचे अक्षय जरग यांना उप महापौरपदाची संधी मिळणार आहे. शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले. जुनसुराज्यने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पहिल्याच वर्षी अक्षय जरग यांना उप महापौरपदाची लॉटरी लागली आहे. (Ruparani Nikam nominated for the mayoral post)
महापौरपदासाठी नगरसेवक विजय खाडे पाटील, प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई, वैभव कुंभार यांची नावे चर्चेत होती. पण त्यामध्ये रुपाराणी निकम यांनी बाजी मारली. रुपाराणी निकम यांचे पती संग्रामसिंह निकम हे खासदार धनंजय महाडिक यांचे समर्थक आहेत. पण गेल्या सभागृहात नगरसेवक म्हणून संध्याराणी निकम यांची कामगिरी अतिशय प्रभावी होती. काँग्रेसची सत्ता असतानाही त्यांनी भाजपकडून त्यांनी किल्ला लढवला होता. तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत भाजपकडून सक्रीय राहिल्याने त्यांच्या नावाला पसंती मिळाली. (Ruparani Nikam nominated for the mayoral post)
शिवसेनेचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. माजी आमदार जयश्री जाधव यांचे चिरंजीव सत्यजीत जाधव उप महापौरपदासाठी आग्रही होते. त्यांनी शेवटपर्यंत पदासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यास थोडा विलंब झाला. अखेर जनसुराज्यचे अक्षय जरग यांना संधी देण्यात आली.
महापौरपदाची निवडणूक लढण्याचा काँग्रेस पक्षाने घेतला आहे. काँग्रेसकडून महापौरपदासाठी सचिन शेंडे तर उपमहापौरपदासाठी दुर्वास कदम यांची घोषणा करण्यात आली. दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे ३४ आणि शिवसेना ठाकरे गटाचा एक असे ३५ इतके संख्याबळ आले. आज अजिंक्यतारा कार्यालयात आमदार जयंत आसगावकर, माजी आमादार ऋतुराज पाटील, शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, शिवसेनेचे सुनील मोदी, सूर्यकांत बुद्धिहाळकर उपस्थित होते. (Ruparani Nikam nominated for the mayoral post)