कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी रुपाराणी निकम, उपमहापौरपदी अक्षय जरग विजयी

Ruparani Nikam as Mayor

कोल्हापूर : प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका महापौरपदी भाजपच्या रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी अक्षय जरग विजयी झाले. आज शुक्रवारी झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या लढतीत महायुती विरुद्ध काँग्रेस, ठाकरे शिवसेना गटात झाली. त्यामध्ये महायुतीने बाजी मारली निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलाल उधळून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. (Ruparani Nikam as Mayor)

महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महायुतीची सत्ता आली आहेत. गेली अनेक वर्षे केंद्रात आणि राज्यात भाजप महायुतीची सत्ता असतानाही कोल्हापूर महानगरपालिकेत महायुतीला सत्तेने हुलकावणी दिली होती. महापौरपदी पहिल्यांदाच्या भाजपला संधी मिळाली असून रुपाराणी निकम या कोल्हापूर महानगरपालिकेतील पहिल्या भाजपच्या महापौर ठरल्या आहेत.

आज शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू सभागृहात महापौर आणि उपमहापौरपदाची निवड झाली. महापौरपदाच्या निवडीत भाजपच्या रुपाराणी निकम यांनी काँग्रेचे सचिन शेंडे यांचा पराभव केला. निकम यांना ४६ तर शेंडेंना ३५ मते मिळाली. रुपाराणी निकम महापौर म्हणून विजयी झाल्या आहेत. अशी घोषणा जिल्हाधिकारी येडगे यांनी केली. (Ruparani Nikam as Mayor)

महानगरपालिकेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि जनसुराज्य पक्षाची सत्ता आहे. उप महापौरपदासाठी जनसुराज्यचे एकमेव नगरसेवक असलेले अक्षय जरग यांना संधी देण्यात आली. जरग यांना ४६ तर काँग्रेसचे दुर्वास कदम यांना ३५ मते मिळाली. अक्षय जरग हे माजी उपमहापौर विक्रम जरग यांचे चिरंजीव आहेत. निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अखेरच्याक्षणी जनसुराज्यचा झेंडा हाती घेतला आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत विजय संपादन केला. शिवसेनेचे १५ नगरसेवक असतानाही उपमहापौरपदी शिवसेनेने त्यांना संधी दिली. (Ruparani Nikam as Mayor)

तब्बल १५ वर्षानंतर महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. २०१० ते २०२० या काळात महानगरपालिकेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. आता राष्ट्रवादीने काँग्रेसपासून फारकत घेत महायुतीत गेली आहे. तरीही आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे ३४ जण निवडून आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. महायुतीत सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला आहे. भाजपचे २५, शिवसेनेचे १५, राष्ट्रवादीचे ४ आणि जनसुराज्यचा १ असे ४६ नगरसेवकांचे बहुमत झाल्याने महानगरपालिकेच्या इतिहासात प्रथमच महायुतीचा झेंडा फडकला आहे. (Ruparani Nikam as Mayor)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर