Ravikiran Ingwale : शिवसेनेकडून खडड्यात रांगोळी काढून, दिवे लावून निषेध

Ravikiran Ingwale

कोल्हापूर : प्रतिनिधी : वाहनधारक आणि नागरिकांना शहरातील खड्ड्यांचा मोठा त्रास होत असताना लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने खड्ड्यात रांगोळी काढून, दिवे लावून निषेध केला. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाध्यक्ष रवीकिरण इंगवले यांनी केले. (Ravikiran Ingwale)

कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट झाली आहे. शहरातील बहुतांश रस्ते खड्ड्यांनी भरले असून, वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागत आहे. महापालिकेला वेळोवेळी निवेदन, घेराव आणि मोर्चा अशा माध्यमातून जागे करण्याचा प्रयत्न शिवसेना ठाकरे गटाने याआधी केला होता. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अद्यापही निष्क्रिय असल्याने दिवाळीच्या पहाटे एक अनोखे आंदोलन छेडण्यात आलं. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांवरील खड्ड्यांत पणत्या लावून आणि त्याभोवती रांगोळ्या रेखाटून, प्रशासनाच्या निष्क्रियतेचा निषेध करण्यात आला. या आंदोलनादरम्यान महापालिका आणि लोकप्रतिनिधींविरोधात जोरदार घोषणाबाजीही झाली. (Ravikiran Ingwale)

आंदोलनात शहराध्यक्ष  विशाल देवकुळे, सागर साळोखे, हर्षल पाटील, पप्पू नाईक, समरजित जगदाळे, अमित पै, गोविंद वाघमारे, विकास बुरबुसे, संजय खराटे, जयंवत पाटील रुद्र पाटील, भूषण मिटके, सुकुमार लाड, सुरज कांबळे, आकाश जळग, दिपक बूळूके, संदीप देवकुळे, सचिन कांरडे, विक्रम पाटील, प्रभाकर पाटील, शैलेश हिरास्कर यांच्यासह शिवसैनिक आणि नागरिकांचा सहभाग होता. (Ravikiran Ingwale)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर