फडणवीसांना इंट्रेस्ट नसता तर गोकुळमध्ये बेकायदेशीर संचालक नेमले नसते

Raut criticizes the CM over the appointment of 'expert directors

जमीर काझी : मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या (गोकुळ)   मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार  संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर  कडाडून टीका केली. त्यांना जर त्यामध्ये इंट्रेस्ट नसता तर बेकायदेशीर संचालक नेमले नसते, हसन मुश्रीफ, महाडीक अशा पराभूत झालेल्यांना पुन्हा आणण्यासाठी हे सुरू आहे, असा हल्लाबोल  त्यांनी केला. (Raut criticizes the CM over the appointment of ‘expert directors’)

फडणवीस लोकशाहीचा कौल पायदळी तुडवतायेत

मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी गोकुळ दूध संघामध्ये राज्य सरकारला इंटरेस्ट नाही, असल्या लहान बाबीकडे राजकारण करत नाही, त्याबाबतचा निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्रीशी चर्चा करुन घेतला आहे, असे म्हटले होते. त्याला प्रत्युत्तर देताना खासदार राऊत म्हणाले की,’ गोकुळ मध्ये सतेज पाटील यांचे पॅनेल विजयी झाले आहे. त्यांच्या यांच्या पॅनेलच्या दोन जिंकलेल्या जागा निवडणूक अधिकाऱ्याने हसन मुश्रीफ यांच्या पॅनेलमध्ये टाकल्या. नाहीतर सतेज पाटील यांच्या पॅनेलला १५ जागा मिळाल्या असत्या, मात्र फडणवीस लोकशाहीचा कौल पायदळी तुडवित आहेत. (Raut criticizes the CM over the appointment of ‘expert directors’)

पाच हजारांत दिवाळी साजरी होते का?

 संजय राऊत म्हणाले,’ आज दिवाळी आहे, मुख्यमंत्री  यांनी जाहीर केले की, मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करायची.  ही संकल्पना चांगली असली तरी  त्यांनी पाहिलं पाहिजे की पाच हजार रुपयांमध्ये दिवाळी खरोखर साजरी होते का?  शेतकऱ्यांसोबत  एक दिवस साजरी करुन प्रश्न संपणार नाही. वारंवार त्यांच्याकडे जावं लागेल.

सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली म्हणून चीनची घुसखोरी थांबत नाही

खासदार राऊत म्हणाले की. पंतप्रधान सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात, म्हणून चीनची घुसखोरी थांबत नाही. पुलवामा थांबत नाही, अशी  एक दिवस कार्यक्रम हा पुढे काय? नवीन काय ? खास कौतुक काय? कर्तव्य आहे त्यांचं. फराळ शेतकऱ्याने घरी बनवलेला की कलेक्टरने मागच्या दाराने पाठवला? असा सवाल देखील राऊतांनी केला. 

मोदी,शाह, फडणवीसांनी अडवाणींना वनवासात पाठवलं

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की,ते होईल नाही होईल पुढला प्रश्न पण मुळ शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष कोणत्याही परिस्थितीत धर्मांध, राष्ट्रद्रोही एनडीए सोबत जाणार नाही. लालकृष्ण अडवाणी मौनात आहेत. १२ वर्षांत त्यांचा छळ केला. मानसिक यातना केल्या. भाजपला सत्तेच्या शिखरावर पोहचवण्याचं काम बाळसाहेब ठाकरे आणि लालकृष्ण डवानी यांनी केले .अडवाणींच्या रथावर स्वार होऊन भाजप दिल्लीच्या तख्तावर पोहचली आहे. त्याच अडवाणींना भाजपने मोदी शाह फडणवीस यांनी बारा वर्षे वनवासात पाठवल्याची टीकाही त्यांनी केली. (Raut criticizes the CM over the appointment of ‘expert directors’)

Related posts

हायकोर्टाकडून गोकुळमधील शासननियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार मंजूर  

कोल्हापूरात महायुतीच्या विरोधात रस्त्यांवर उतरला जनसागर

शाळांच्या संवर्धनासाठी ठोस कृती कार्यक्रम राबविणार : आमदार कौस्तुभ गावडे