Rakesh Kishor : माथेफिरू वकिलाचा दैवी शक्तीकडून मार्गदर्शन मिळत असल्याचा दावा

Rakesh Kishor

मुंबई : प्रतिनिधी : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर बूट फेकणाऱ्या माथेफिरु वकील राकेश किशोर याला या घटनेबद्दल प्रश्चाताप वाटप नसल्याचे वक्तव्य केले आहे. एकीकडे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बूट फेकणाऱ्या वकिलाला माफ केले असताना ७२ वर्षीय  वकील राकेश किशोर पश्चाताप वाटत नसल्याचे बोलून दाखवले आहे. मला दैवी शक्तीकडून मार्गदर्शन मिळत आहे, असा दावा वकिलाने केला आहे. (Rakesh Kishor)

सोमवारी (दि.६) सुप्रिम कोर्टात सरन्यायाधीश गवई यांच्यासमोर सुनावणी सुरू होती. यावेळी माथेफिरू वकील राकेश किशोर याने पायातील बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करत असताना सुरक्षारक्षाकांनी त्याला पकडले. त्याने कोर्टात आणि कोर्टाबाहेर ‘सनातन का अपमान नही सहेंगा हिंदूस्थान’ अशी घोषणाबाजीही केली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. पण पण सरन्यायाधीश गवई यांनी विचलित न होता सुनावणी सुरू ठेवली. त्यांच्या कृतीच सर्वत्र  स्वागत आहे. माथेफिरु वकिलावर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे पण गवई यांनी मनाचा मोठेपणा दाखवत माथेफिरू वकिलाला माफ करण्याचा निर्णय घेतला. (Rakesh Kishor)

दरम्यान एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना माथेफिरु राकेश किशोर म्हणाला. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबध नाही. मी तरुंगात असतो तर बरे झाले असते. कारण माझे कुटुंब खूप दु:खी आहे. मला दैवी शक्तीकडून मार्गदर्शन मिळत आहे. भगवान विष्णूशी शीर नसलेल्या मूर्तीशी संबधित खटल्याचा सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी जे म्हटले, ते ऐकूण मी नाराज झालो. सरन्यायाधीशांच्या निवाड्यानंतर मला झोप येत नव्हती. देव मला विचारत होते की इतक्या अपमानानंतर मी कसा झोपू शकतो. भारतीय न्यायव्यवस्था कायद्याने चालते, बुलडोझरच्या नियमाने नाही. (Rakesh Kishor)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर