पोलिसांच्या ‘वसुली’मुळे महाराष्ट्र बरबाद; राजू शेट्टींची फडणवीसांवर टीका

Raju Shetty criticizes Fadnavis. Raju Shetty

कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्गच्या पोलिस अधिकाऱ्यांवर हप्ते वसुली करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी केलेल्या आरोपांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आरोप केला आहे.  देवेंद्र फडणविसांच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या या “ वसुली “ व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होवून उडतां पंजाब झाला आहे हे  त्यांनी मान्य करावे अशी मागणी केली आहे.

राजू शेट्टी यांनी असे म्हटले आहे की, एकेकाळचे माझे लोकसभेतील सहकारी आमदार निलेश राणे यांनी अत्यंत वास्तव घटना समाजासमोर मांडली आहे. राज्यात अवैद्य धंद्याना ऊत आलेली आहे हे जळजळीत सत्य सर्व समाज उघड्या डोळ्यांनी बघत आहे.  मी गेल्याच आठवड्यात बोललो होतो की महाराष्ट्राची वाटचाल उडता पंजाबसारखी झाली आहे. या वाक्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मी महाराष्ट्र बदनाम करत असल्याचे वक्तव्य करून त्याला दुजोरा दिला. (Raju Shetty criticizes Fadnavis. Raju Shetty)

देवाभाऊ तुमच्यासारख्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्र बदनाम नव्हे बरबाद होत आहे. तुमच्याच महायुतीतील शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी पोलिस खात्यावर केलेले आरोप ऐकावेत.  एका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलिस जर दोन ते अडीच कोटीची कमाई करत असतील तर महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील परिस्थिती काय असेल याचा अंतर्मुख होवून विचार करावा, असेही राजू शेट्टी यांनी पत्रकात म्हटले आहे.

राजू शेट्टी यांनी अमली पदार्थाची विक्री कोण करतय , मटका कोण चालवतय , अवैद्य दारू विक्री कोण करतय , गांजा कोण पुरवत आहे. मात्र या सगळ्या लोकांकडून पोलिस राजरोसपणे हप्ते गोळा करत आहेत हे राज्यातील पोलिस दलातील सर्व अधिकाऱ्यांना माहित आहे याकडे लक्ष वेधले. निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जी आकडेवारी सांगितली आहे त्यापेक्षा कोल्हापूर , सांगली , पुणे , मुंबई, छत्रपती संभाजीनगर , नागपूर , सोलापूर , ठाणे , नवी मुंबई, नाशिक , यासारख्या ठिकाणी तर राजरोसपणे पोलिसांना हप्ते देवून दरमहा शेकडो कोटीची वसुली सुरू असल्याने  अवैद्य धंद्याचा महापूर आला आहे, असा आरोप केला आहे.  (Raju Shetty criticizes Fadnavis. Raju Shetty)

 अवैध व्यवसायातील हप्त्यांची आकडेवारी

मटका सुरू ठेवण्यासाठी दरमहा १५ ते २५ हजार, अवैद्य दारूविक्रीसाठी दरमहा १० ते १५ हजार, अमली पदार्थ विक्रीतून दरमहा ७५ हजार ते १.५० लाख, गांजा विक्रीतून दरमहा २५ ते ५० हजार, अवैद्य लॅाज व्यवसायासाठी दरमहा १० ते १५ हजार याप्रमाणे पोलिसांचे सरासरी दर ठरले असून  ज्यांची विक्री व व्यवसाय जास्त आहेत त्यांचे दर तर गगनाला भिडलेले आहेत, अशी आकडेवारी शेट्टी यांनी दिली आहे.  

राज्यातील पोलिस ठाण्यातील बीट अंमलदार , पोलिस निरीक्षकपासून ते जिल्हापोलिसप्रमुख कार्यालयातील , स्थानिक गुन्हे शाखा , जिल्हा गुप्तचर शाखेच्या पोलिस निरीक्षकांना सर्व अड्डे माहित आहेत. एखाद्या ठिकाणी पोलिस कारवाई करणार असतील तर कारवाई होण्या आधीच संबंधितांना टिप देवून सावध केले जाते, असा आरोपही केला आहे.

देवेंद्रजी तुमच्या सत्तेच्या हव्यासापोटी होत असलेल्या या “ वसुली “ व्यवस्थेमुळे महाराष्ट्र बरबाद होवून उडतां पंजाब झाला आहे हे मान्य करा .अजून गावनिहाय, शहरनिहाय  कोणत्या गल्लीत काय काय अवैद्य व्यवसाय सुरू आहेत याची यादीही पाठवू शकतो, असेही स्पष्ट केले आहे. (Raju Shetty criticizes Fadnavis. Raju Shetty)

Related posts

गुजरात टायटन्स संघाच्या बसला लागली आग

प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी, प्रशांत परिचारक यांना धक्का

आरसीबीचे सलग दुसरे `विराट` विजेतेपद