मुले पळविणारी टोळी, बेपत्ता तरुणी प्रश्नावर राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे

Raj Thackeray's letter on the issue of child abduction gangs

जमीर काझी : नागपूर : गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यासह राज्यभरातून मुले पळविणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत, तसेच तरुणी बेपत्ता होण्याचे प्रमाण धक्कादायकपणे वाढले आहे, याबाबत पोलिसांकडून योग्य प्रकारे कार्यवाही होत नसल्याने हिवाळी अधिवेशनात चर्चा करून त्याबाबत प्रतिकात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यांना पत्र लिहून हे साकडे घातले आहे.दोन्ही सभागृहात मनसेचा एकही आमदार नाही, त्यामुळे राज यांनी थेट मुख्यमंत्र्यांना याबाबत गंभीर्याने लक्ष घालण्यासाठी मागणी केली आहे.

मुलं पळवणाऱ्या टोळ्यावर सरकार काय कारवाई करते?

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, नागपूर, जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर अशा जिल्ह्यांमध्ये लहान मुलांना पळवून, नंतर त्यांना कामाला जुंपणाऱ्या, त्यांना भीक मागायला लावणाऱ्या आंतरराज्य टोळ्या तयार झाल्या आहेत आणि या टोळ्या सर्रास लहान मुलं पळवत आहेत आणि यावर सरकार नक्की काय कारवाई करत आहे हेच समजत नाही.  (Raj Thackeray’s letter on the issue of child abduction gangs)

राज ठाकरेंचे सरकारला प्रश्न

एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार २०२१ ते २०२४ या काळात या प्रकारात जवळपास ३० टक्के वाढ झाली आहे. त्याबाबत लहान मुले पळवण्याच्या अमुक केसेस दाखल होतात आणि त्यातली इतकी टक्के मुलं परत शोधली जातात आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे सुखरूप परत पाठवली जातात,अशा आशयाचे सरकारी उत्तर महाराष्ट्राला नको आहे, असे सांगून राज ठाकरे यांनी मुळात एनसीआरबी जे आकडे सांगत आहे ते आकडे म्हणजे किती पालकांनी पोलिसांकडे तक्रारी नोंदवल्या आहेत त्याचा तपशील सांगितला जातो.  पण अशा काही हजार तक्रारी पोलिसांपर्यंत पोहोचत तरी असतील का? आणि समजा मुलं पुन्हा सोडवून आणली तरी त्या काळात लहान मुलांच्या मनावर जो आघात होतो, त्याचं काय? मुळात मुलं पळवून नेणारी टोळी कार्यरतच कशी होते आणि ती इतक्या राजेरोसपणे काम कशी करते? यावर काहीतरी जबरदस्त कृती करावी असं सरकारला काय  वाटत नाही? अशी विचारणा  राज ठाकरे यांनी केली आहे. (Raj Thackeray’s letter on the issue of child abduction gangs)

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे

रस्त्यांवर, स्टेशनवर, बस स्टँडवर लहान मुलं भीक मागताना बघतो, ती कोण आहेत ? त्यांच्या सोबतचे जी माणसं भीक मागत असतात ते खरंच त्यांचे आई-वडील असतात का ? याचा तपास किंवा वेळ पडल्यास अगदी डीएनए टेस्ट करावी असे आदेश सरकारला द्यावेसे का वाटत नाही ? असा सवाल करीत मुख्यमंत्री आणि गृहमंत्री या नात्याने तुम्ही लक्ष घालावे, अशी मागणी केली आहे. (Raj Thackeray’s letter on the issue of child abduction gangs)

अधिवेशनात चर्चा घडवून आणावी

आज या राज्यात लहान मुले, तरुण मुली पळवल्या जात आहेत, महाराष्ट्रातल्या जमिनी पळवल्या जात आहेत , यावर विधिमंडळात चर्चा व्हावी, त्यावर एकमुखाने काही पाऊलं उचलायला प्रशासनाला भाग पाडावे,असे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना वाटत नाही का ? हिवाळी अधिवेशन म्हणजे सरकारच्या चुकलेल्या अंदाजपत्रकाला ठिगळ लावण्यासाठी पुरवणी मागण्या मंजूर करून घेण्याची सोय इतकंच प्रयोजन आहे का ? अधिवेशनात अनेकदा उत्तरं द्यायला मंत्री सभागृहात नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे लहान मुलं असोत की गायब होणाऱ्या मुली अशा विषयावर विधिमंडळात चर्चा होईल अशी अपेक्षा करणं पण अवाजवी वाटेल अशी परिस्थिती आहे. अधिवेशनात यावर चर्चा घडवून आणून नव्हे तर ठोस कृती करावी अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. (Raj Thackeray’s letter on the issue of child abduction gangs)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर