आणंद (गुजरात) : काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला. आयोगाच्या पक्षपातीपणामुळे निवडणूक पराभव झाल्याचे ते म्हणाले. आमच्या पराभवाला भाजप-आरएसएसच्या नियंत्रणाखाली काम करणारा ‘बायस अम्पायर’च जबाबदार असल्याची टीका त्यांनी केली. (Rahul Criticizes EC)
आणंद येथे काँग्रेस जिल्हाध्यक्षांचे प्रशिक्षण शिबिर शनिवारी (२६ जुलै) सुरू झाले. यावेळी त्यांनी उमेदवार निवडताना तुमचे मत नक्की विचारात घेतले जाईल, असे आश्वासन जिल्हाप्रमुखांना दिले.
भाजपचा गड असलेल्या गुजरातमध्येच त्यांना पराभूत करणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी केले. (Rahul Criticizes EC)
२०२७ च्या राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने आणंद शहराजवळील एका रिसॉर्टमध्ये जिल्हा काँग्रेस समित्यांच्या नवनियुक्त अध्यक्षांसाठी शिबिराचे आयोजन केले आहे. पक्षाच्या ‘मिशन २०२७’ साठी रोड मॅप तयार करण्याच्या उद्देशाने शिबिर घेण्यात आले आहे. रविवारपर्यंत (२८ जुलै) शिबिर चालणार आहे.
गांधी यांनी जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केले. मी पूर्णपणे पक्ष कार्यकर्त्यांसोबत आहेत असे त्यांनी आश्वासन दिल्याचे बैठकीनंतर गुजरात काँग्रेसचे प्रमुख अमित चावडा यांनी पत्रकारांना सांगितले. (Rahul Criticizes EC)
‘‘राहुल गांधींनी आम्हाला लोकांशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्यास सांगितले. विविध निवडणुकांसाठी उमेदवार निवडण्यापूर्वी शहर आणि जिल्हा युनिट प्रमुखांशी सल्लामसलत केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले,’’ असे राजकोट काँग्रेसचे प्रमुख राजदीपसिंह जडेजा म्हणाले.
आणखी एका नेत्याने सांगितले की, राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर ‘पक्षपाती पंच’ असल्याचा आरोप केला. (Rahul Criticizes EC)
‘‘क्रिकेटमध्ये, जर तुम्ही आऊट होत असाल तर तुम्ही स्वतःवरच शंका घ्यायला लागला. परंतु नंतर तुम्हाला कळते की तुम्ही तुमच्या चुकीमुळे बाहेर पडत नाही तर पंचच पक्षपाती आहेत. राहुल गांधी यांनी हे सांगितले आणि आम्हाला आत्मविश्वास दिला. निवडणूक आयोगाच्या संशयास्पद मतदार यादीमुळे आम्हाला २०१७ च्या गुजरात निवडणुकीत पराभव पत्करावा लागला,’’ असे काँग्रेसचे सुरेंद्रनगर जिल्हाप्रमुख नौशाद सोलंकी म्हणाले.
‘‘राहुल गांधी यांनी भाजपला त्यांचे मुख्य केंद्र असलेल्या गुजरातमध्ये पराभूत करणे खूप महत्वाचे आहे यावर भर दिला. त्यांनी आम्हाला सांगितले की उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये (भाजपला पराभूत करण्यासाठी) आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील असे पक्षाचे मत होते. जर आपण गुजरातमध्ये भाजपला पराभूत करू शकलो तर त्यांचा सर्वत्र पराभव होऊ शकतो,’’ असे सोलंकी पुढे म्हणाले.
हेही वाचा :
आपलं वाटोळं झालं, आयटी पार्क बेंगलोर अन् हैद्राबादला चालले
नितीशकुमार सरकारला पाठिंबा दिल्याची लाज वाटते : चिराग