‘निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर’ या पुस्तकाचे प्रकाशन

Publication of Dr. Bachulkar's Book

कोल्हापूर : प्रतिनिधी :  वनस्पती तज्ञ व पर्यावरण अभ्यासक  प्राचार्य डॉ. मधुकर बाचूळकर  यांचा संघर्षमय आणि कार्यकर्तुत्वपर जीवनपट “निसर्गदूत – प्राचार्य  डॉ.मधुकर बाचूळकर  –चोळेकर” या पुस्तकात मांडला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा २२ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वाजता जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून, शहाजी लॉ कॉलेज येथे  होणार आहे. (Publication of Dr. Bachulkar’s Book)

      मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्याचे माजी अतिरिक्त प्रधान सुनील लिमये यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून प्रा. डॉ .जय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याला प्राचार्य अभयकुमार साळुंखे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, प्रा.डॉ.एस.आर.यादव शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. व्ही.एन शिंदे, डॉ. विश्वनाथ मगदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. (Publication of Dr. Bachulkar’s Book)

एक पर्यावरणप्रेमी  प्राध्यापक, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी काय काय करू शकतो ,याचा प्रत्यक्ष प्रत्यय देणारे हे पुस्तक आहे. वनौषधींचं संरक्षण -संवर्धन करण्यापासून ,सातारा येथील कास पठाराला “जागतिक वारसा ” मिळवून देण्यात त्यांचे योगदान आहे. “इंडाल” सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या विरोधात जाऊन, खाणकामा विरुद्ध लढा देऊन याकंपनीस देशातून हद्दपार करण्यात ते अग्रेसर होईल.  नव महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पास, शक्तिपीठ महामार्गास विरोध केला आहे.  जैवविविधता, पर्यावरणासाठी पाय रोवून यशस्वी लढे देणारा हा ज्ञानोपासक, जनजागृती बरोबरच अनेक विधायक, सकारात्मक आणि संशोधनात्मक कार्यांमध्ये कसं यशस्वी योगदान देऊ शकतो ,तसेच कसा विद्यार्थीप्रिय, आदर्श-गुणवंत शिक्षक आणि कडक शिस्तीचा प्राचार्यही  बनू शकतो, याचं प्रत्यंतर हे पुस्तक वाचताना येते. पश्चिम घाट, जैव विविधता संवर्धनासाठी आणि पर्यावरण विषयक दिलेल्या लढ्यासह सर्वच स्तरावर दिलेल्या योगदानाचा लेखक डॉ.मधुकर येवलुजे यांनी आढावा घेवून चांगले शब्दांकन केले आहे. (Publication of Dr. Bachulkar’s Book)

Related posts

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर

बागेश्वर बाबांचें शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या