महाविकास आघाडीची विधीमंडळाच्या पायऱ्यावर गॅस दरवाढीविरोधात आंदोलन

Protests against gas price hike

मुंबई : “फसले परराष्ट्र धोरण, सामान्य जनतेच्या नशीबी लाकूड आणि सरण”, “गॅस काढा,गॅस काढा,गटारीतून गॅस काढा”, अशा उपरोधिक  घोषणा देत विरोधी महाविकास आघाडीने विधिमंडळाच्या पायऱ्यावर बुधवारी जोरदार निदर्शने करत केंद्र सरकारच्या धोरणाचा तीव्र निषेध केला.

  अमेरिका आणि इराणच्या युद्धाचा भडका उडाला असून त्याचा  मोठा फटका देशाला बसत आहे. इंधन टंचाई तीव्र झाली असून घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६० रुपयाने वाढली आहे.  गॅस सिलिंडरचे बुकिंग यापूर्वी २१ दिवसांनी केले जात होते.  आता गॅस बुकिंग करण्याची मर्यादा वाढवली असू आता २१ दिवसांऐवजी  २५ दिवसाने करता येणार आहे. (Protests against gas price hike)

व्यावसायिक गॅस पुरवठा होत असल्याने राज्यातील अंदाजे ३० टक्के हॉटेल बंद झाले आहेत. जर गॅस पुरवठा झाला नाही तर येत्या काही दिवसात हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद होतील, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्या निषेधार्थ  आज महाविकास आघाडीने पायऱ्यांवर आंदोलन केले.लाडक्या बहिणींवर गॅसवर ठेवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,अशा घोषणा देत विरोधकांनी  आंदोलन केले. आंदोलनात काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, विधानपरिषदेतील गटनेते सतेज पाटील, आमदार भाई जगताप यांच्यासह आमदार सहभागी झाले होते. (Protests against gas price hike)

दरम्यान गॅस दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधी वाढविल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून गुरुवारी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार  आहे.सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. अन्यायी दरवाढ  तात्काळ मागे घ्यावी, तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, सेल, विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते राज्यातील सर्व जिल्ह्यात  अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ऍड. गणेश पाटील यांनी दिली आहे. (Protests against gas price hike)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर