मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी सरकारला १५ दिवस मिळतील : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan's criticism of the government

सातारा : सगळ्याच नगरपालिका आणि नगरपंचायतीचे निकाल २१ डिसेंबरला जाहीर करावेत या न्यायालयाच्या आदेशावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर टीका केली आहे. सरकारला मतपेट्यांमध्ये घालमेल करण्यासाठी १५ दिवस मिळतील असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

नागपूर खंडपीठाने सर्वच नगरपालिका आणि नगरपंचायतीची मतमोजणी २१ डिसेंबरला करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे २२२ नगरपालिका आणि १८ नगरपंचायतीची आज होणारी मतमोजणी स्थगित झाली आहे. मतमोजणी तब्बल १८ दिवस पुढे गेली आहे. सर्व ईव्हीएम मशिन स्ट्राँग रुममध्ये ठेवण्याचे तसेच पोलिस बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणुकीत घोळावर पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाना साधला आहे. (Prithviraj Chavan’s criticism of the government)

नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर ते म्हणाले की, “निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करते, हे यातून स्पष्ट झाले आहे. मतमोजणी इतके दिवस पुढे ढकलल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास उडत चालला आहे. १५ दिवस मतपेट्या सुरक्षेत असल्या तरी सत्ताधाऱ्यांना त्यात गडबड करायला भरपूर वेळ मिळणार आहे, अशी शंका घेण्यास वाव आहे.” अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. (Prithviraj Chavan’s criticism of the government)

नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल निकाल लांबणीवर पडण्यास राज्य सरकारच जबाबदार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. “हे प्रकरण जेव्हा न्यायालयात सुरू होते, तेव्हा सरकारी वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडणे अपेक्षित होते. जर सरकारने योग्य युक्तिवाद केला असता, तर निकाल पुढे ढकलण्याची वेळ आली नसती. मात्र, न्यायालयात सरकारला अपयश आले आणि आता त्याचे खापर निवडणूक आयोगावर फोडले जात आहे.” अशी टीका त्यांनी केली. “गेली १० वर्षे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे भाजपने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. हा लोकशाही संपवण्याचा डाव असून, देशात हळूहळू हुकूमशाहीची पावले उमटत आहेत. जनता जागृत झाली नाही, तर असेच सुरू राहील. सरकार आणि आयोग केवळ एकमेकांवर जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. न्यायालयात सुनावणी सुरू असताना सरकार झोपले होते का?,” असा सवाल त्यांनी यावेळी केला. (Prithviraj Chavan’s criticism of the government)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर