Haaland’s 100th goal : प्रिमियर लिगमध्ये हालांडचा १०० वा गोल

Haaland's 100th goal

नवी दिल्ली : प्रिमियर लिगच्या इतिहासात सर्वात जलद १०० गोल करणारा खेळाडू मॅचेंस्टर सिटीचा स्ट्रायकर एर्लिंग हालांड ठरला. अतिशय चुरशीच्या सामन्यात मँचेस्टर सिटीने फुलहॅमवर ५-४ असा रोमांचक विजय मिळवला. या सामन्यात हालांडने १०० व्या विक्रमी गोलची नोंद केली. (Haaland’s 100th goal)

प्रिमियर लिगच्या इतिहासात सर्वात जलद १०० गोल करणारा हालांड खेळाडू ठरला आहे. मुळचा नार्वेचा सुपरस्टार १११ सामन्यामध्ये हा टप्पा गाठला. त्याने अलन शिअररचा १२४ सामन्याचा विक्रम हालांडने मोडला. (Haaland’s 100th goal)

मँचेस्टर सिटीने या सामन्यात ५-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामध्ये १७ व्या मिनिटाला हालांडने गोल केला. हा त्याचा प्रिमियर लिगमधील शंभरावा गोल ठरला. तर यंदाच्या हंगामातील १५ वा गोल ठरला.  सिटीकडून हालांड, रेजडस, फोडेनने दोन तर सँडर बर्गने एक गोल केला. फुलहॅमकडून पहिला गोल इमिली स्मिथ रौव याने मध्यंत्तरापूर्वी जादा वेळेत ४७ व्या मिनिटाला केला. मध्यंत्तरास सिटी २-१ ने आघाडीवर होती. मँचेस्टर सिटीने ५-१ अशी आघाडी घेतली असताना फुलहॅमने जोरदार पुनरागमन केले. फुलहॅमकडून अलेक्स इवोबीने ५७ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर सॅम्युयल चुकवेझने ७२ आणि ७८ मिनिटाला गोल केले. (Haaland’s 100th goal)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर