कोल्हापूरच्या शाश्वत विकासाला प्राधान्य : आमदार राजेश क्षीरसागर

Priority to the sustainable development of Kolhapur

कोल्हापूर : कोल्हापूरने आजवर शेती आणि उद्योगात आपली ओळख निर्माण केली आहे. आता महायुती सरकारच्या काळात आय.टी., पर्यटन, विधी व न्याय, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील या मोठ्या प्रकल्पांमुळे कोल्हापूर हे महाराष्ट्राचे एक प्रमुख ‘इकोनॉमिक हब’ म्हणून उदयास येत आहे. या प्रकल्पांची वेळेत पूर्तता करून कोल्हापूरचा अर्थकणा खऱ्या अर्थाने पोलादी करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली. (Priority to the sustainable development of Kolhapur)

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क येथील गद्रे उद्यान येथे ‘मिसळ पे चर्चा’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रामुख्याने उपस्थित होते. ते पुढे म्हणाले कि, दक्षिण महाराष्ट्राचे प्रमुख केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीला आता नवी दिशा मिळत आहे. प्रलंबित असलेले आय.टी. पार्क, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच,  करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडा, शक्तीपीठ महामार्ग, पूरनियंत्रण प्रकल्प, आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर या सर्वच बाबतीत सकारात्मक निर्णय घेवून महायुतीने आपली निर्णयक्षमता सिद्ध केली आहे. कृषि, उद्योग, वस्त्रोद्योग, माहिती व तंत्रज्ञान, पर्यटन क्षेत्र या पंचसूत्री क्षेत्रातून जिल्ह्याच्या आणि शहराच्या आर्थिक उन्नतीचे सुवर्णद्वार खुले केले आहे. या क्षेत्रांशी निगडीत प्रकल्पांमुळे जिल्ह्यात केवळ पायाभूत सुविधाच वाढणार नाहीत, तर हजारो हातांना रोजगार मिळून अर्थव्यवस्था भरभराटीला येणार आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या विकासाचा उद्देश पुढे नेणाऱ्या महायुती उमेदवारांना मतांच्या रूपाने साथ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  (Priority to the sustainable development of Kolhapur)

यावेळी महायुतीचे उमेदवार प्रमोद भगवान देसाई, वंदना विश्वजित मोहिते, राजनंदा महेश महाडिक, विजयेंद्र विश्वासराव माने, सत्यजित कदम, डॉ.अनिल कापडिया, नितीन आडके, भूषण पाटील, चिन्मय कडेकर, राजू परीख, प्रदीप महाजन, विश्वजित मोहिते, अनुराधा मोहिते, मुकुंद सावंत, संदीप चिगरे, समरजीत मोहिते, शक्ती मोहिते, शिल्पा घोडके आदी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार