Poonch : पुंछमध्ये १३ नागरिकांचा मृत्यू

Poonch

नवी दिल्ली : प्रतिनिधी : भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर ५९ जण जखमी झाले आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. (Poonch)

पहेलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला असून त्याचे पडसाद नियंत्रण रेषेवर उमटले आहेत. पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले असून त्यांनी गोळीबार सुरू केला आहे. छोट्या तोफांचाही वापर केला आहे. या हल्ल्यात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. सीमेरेषेवरील घरांचे नुकसान झाले असून जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. काही गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. (Poonch)

भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये वायुदलाने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने गोळीबार सुरू केला आहे. दरम्यान बुधवारी पाकिस्तानकडून झालेल्या तीव्र गोळीबारामुळे जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सीमावर्ती गावांमधील रहिवासी सुरक्षितस्थळी गेले होते. गुरुवारी सकाळी हे नागरिक त्यांच्या घरी परतले. परत आलेल्या ग्रामस्थांनी सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारामुळे निवासी मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले. तोफखान्याच्या गोळीबारापासून बचावासाठी स्थानिक रहिवासी त्यांच्या कुटुंबियांसह आणि पशुधनासह घाबरून घराबाहेर पडले होते. राजौरी परिसरातील अनेक सीमावर्ती गावांना स्थलांतराचा फटका बसला, गोळीबार कमी झाल्यानंतरच कुटुंबे परतू लागली. (Poonch)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक