Lahor Blast : लाहोरमधील स्फोटांनी पाकिस्तान हादरलं

Lahor Blast

नवी दिल्ली : पाकिस्तानचे प्रमुख शहर असलेल्या लाहोर मध्ये गुरुवारी सकाळी तीन मोठे स्फोट झाल्याने पाकिस्तान हादरुन गेले आहे. हे स्फोट विमानतळावर झाल्याने पाकिस्तानात घबराट पसरली आहे. या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत पोहोचल्याने स्फोटाबाबत नागरिकांकडून तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Lahor Blast)

भारताने ऑपरेशन सिंदूर या मोहिमेद्वारे पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करुन दहशतवादाचे नऊ अड्डे उद्धवस्त केले. या ऑपरेशनमध्ये एक हल्ला भारताने लाहोरजवळील जैश-ए-मोहम्मदच्या तळावर केला होता. या हल्ल्यात भारतीय विमाने शंभर किलोमीटर पाकिस्तानमध्ये घुसली होती. त्यामुळे पाकिस्तान भितीचे छायेखाली वावरत असताना आज गुरुवारी सकाळी लाहोर शहरात तीन स्फोट झाल्याचे वृत्त समोर आले आहे. लाहोरमध्ये ड्रोन हल्ले झाल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. लाहोर विमानतळाजवळ झालेल्या स्फोटांचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. स्फोटानंतर लोक सैरावैरा पळू लागले. स्फोटाने धुराचे लोट दिसून आले. (Lahor Blast)

रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी अधिकारी सध्या स्फोटांचे ठिकाण आणि स्फोट कोणत्या कारणाने झाला याचा शोध घेत आहेत. लाहोरमधील गोपाल नगर आणि नसीराबाद भागात वॉल्टन विमानतळाजवळील वॉल्टन रोडवर एकापाठोपाठ तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटानंतर परिसरात अफरातफरी माजली. लोक सैरावैरा धावू लागले. तसेच अनेक लोक घराबाहेर पडले. लोकांनी धुराचे लोट दिसल्याचे सांगितले. (Lahor Blast)

लाहोर विमानतळाजवळ ड्रोन हल्ला

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लाहोर वॉल्टन विमानतळावर ड्रोन हल्ला झाला आहे. स्फोटानंतर लाहोर विमानतळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. हा एक प्रकारचा ड्रोन हल्ला असल्याचे बोलले जात आहे. वॉल्टन विमानतळाजवळ पाकिस्तानी लष्कराचे युनिट असलेल्या ठिकाणी हा स्फोट झाला आहे. कराची विमानतळावरील विमान वाहतूक सध्या थांबवण्यात आली आहे. (Lahor Blast)

एआरवाय न्यूजनुसार लाहोर शहरात तीन स्फोटांचे आवाज ऐकू आले. स्फोटाचा आवाज खूप मोठा होता असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आहे. या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. हल्ल्याच्या आवाजाने लाहोर हादरुन गेले आहे. (Lahor Blast)

Related posts

बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलकांवर दडपशाहीचा वरवंटा

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

दिल्ली पोलिसांचे क्रौर्य चिंताजनक