वरळीतील भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी बिल्डरला देण्याचा घाट  : वर्षा गायकवाड

Plot in Worli set to be handed over to a builder

जमीर काझी :  मुंबई : मुंबई विकण्याचा भारतीय जनता पक्षाचा सपाटा सुरुच असून महानगरपालिकेच्या सत्ता मिळताच मुंबईतील मोक्याचे भूखंड लाडक्या बिल्डरला  विकण्याचा घाट घातला जात आहे. ५,१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटीत  देण्याचा प्रयत्न सुरू असून  हा व्यवहार महापालिकेचे नुकसान करणारा असून बिल्डर व सत्ताधाऱ्यांचे खिसे भरणारा आहे. ही लिलाव प्रक्रिया तात्काळ थांबवावी अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. (Plot in Worli set to be handed over to a builder)

महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना त्याबाबत पत्र  लिहिले आहे. त्यात म्हटले आहे  की, मुंबई शहरात महानगरपालिकेच्या मालकीचे अनेक भागात भूखंड आहेत, हे भूखंड विकसीत करताना, विकासक अथवा व्यावसायीकांना देताना पारदर्शकता असणे गरजेचे आहे. परंतु मागील काही वर्षापासून मुंबई शहरातील भूखंडांचे लिलाव करताना योग्य प्रक्रिया राबविली जात नाही असे दिसून येत आहे. अनेक भूखंड नियमबाह्य, बेकायदेशीररित्या देण्यात आलेले आहेत. मुंबई महानगरपालिका सक्षम असताना असे भूखंड महानगरपालिका स्वतःच का विकसीत करत नाही? 

वरळीतील महत्वाच्या ठिकाणी असलेला ५,१६६ चौरस मीटरचा भूखंड अवघ्या ४५५ कोटी रुपयांत एका विकासकाला देण्यात आला आहे. हा व्यवहार महानगरपालिकेचे नुकसान करणारा आहे. पंचतारांकित हॉटेलच्या बदल्यात बीएमसीला केवळ ४५५ कोटी आणि चाचणी प्रयोगशाळेसाठी फक्त १३०० चौरस मीटर जागा मिळणार आहे. या व्यवहारातील अटी केवळ विशिष्ट बिल्डरांना सोयीस्कर ठरतील, अशा प्रकारे ठरवण्यात आल्या आहेत.  (Plot in Worli set to be handed over to a builder)

बीएमसीच्या मालमत्तांच्या लिलावावर बीएमसी गट नेत्यांसमोर चर्चा होणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून योग्य त्या कायदेशीर बाबींचा विचार करूनच असे व्यवहार केले पाहिजेत, अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. वरळीतील भूखंडाच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला असून बीएमसीच्या मोक्याच्या मालमत्तांचे अनियोजित लिलाव करण्यास काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून रस्त्यावर उतरून लढाई लढू, असा इशाराही गायकवाड यांनी  दिला आहे. (Plot in Worli set to be handed over to a builder)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर