सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘पाटाकडील’ उपांत्य फेरीत

'Patakadil' Enters Semifinals of Satej Cup Football Tournament

कोल्हापूर : प्रतिनिधी : सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत पाटाकडील तालीम मंडळाने प्रॅक्टिस फुटबॉल क्लबचा २-१ असा पराभवकरत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाटाकडील तालीम मंडळाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. (‘Patakadil’ Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)

पाटाकडील आणि प्रॅक्टिस या दोन संघात चुरशीचा सामना होणार असल्याने शाहू स्टेडियमवर प्रेक्षकांनी गर्दी केली होती. सामन्याच्या आठव्या मिनिटाला प्रॅक्टिसच्या सागर चिलेने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. परतफेड करण्यासाठी पाटाकडील संघाने आक्रमक चढाया केल्या. १४ व्या मिनिटाला यशराज कांबळेने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. मध्यंत्तरापर्यंत सामना बरोबरीतच राहिला. (‘Patakadil’ Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)

उत्तरार्धात सामन्यात आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरले. आघाडी मिळवण्यात पाटाकडीलला यश मिळाले. ४९ व्या मिनिटाला अमीर खजीरने गोल करत पाटाकडील संघास २-१ अशी आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी प्रॅक्टिसने खोलवर चढाया केल्या. पण पाटाकडीलने भक्कम बचाव राखत गोल चढू दिला नाही. पूर्णवेळ एक गोलची आघाडी कायम टिकवत पाटाकडीलने सामना जिंकून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. (‘Patakadil’ Enters Semifinals of Satej Cup Football Tournament)

गुरुवारी बालगोपाल तालीम मंडळ आणि वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी चार वाजता सामना होणार आहे.

Related posts

आयपीएलमध्ये विदर्भाच्या प्रफुल्ल हिंगेचा नवा विक्रम  

सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत ‘दिलबहार’उपांत्य फेरीत  

श्रेयस अय्यरच्या पंजाब किंग्जचा सनराईज हैद्राबादवर विजय