Payagpur : मदरशाच्या बाथरुममध्ये ४० कोंडलेल्या मुली सापडल्या

Payagpur

लखनऊ: बहराईचच्या पयागपूर उपविभागातील एका बेकायदेशीर मदरशाच्या परिसरात बुधवारी संध्याकाळी जिल्हा प्रशासनाने छापा टाकला. मदरशाच्या  बाथरूममध्ये चाळीस अल्पवयीन मुली आढळल्या. मदरसाचा संचालक खलील अमद पळून गेला आहे. त्यांच्या मुलीने दावा केला आहे की हे कोचिंग सेंटर आहे. (Payagpur)

 मदरसा बेकायदेशीरपणे चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यावर, पयागपूरचे उपविभागीय दंडाधिकारी (एसडीएम) अश्वनी पांडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. महिला कॉन्स्टेबलसह पोलिस पथकाने मदरशात प्रवेश केला. छाप्यादरम्यान, पथकाला बाथरूममध्ये कोंडलेल्या मुली आढळल्या.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पयागपूरच्या पहेलवाडा परिसरातील मदरशात काहीतरी संशयास्पद घडत असल्याचा ग्रामस्थांना बराच काळ संशय होता. स्थानिकांनी याबाबत अनेक तक्रारी दाखल केल्या होत्या. (Payagpur)

एसडीएमने पोलिस कर्मचारी आणि महिला कॉन्स्टेबलसह परिसरात छापा टाकला. पथकाने आत जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा मदरसा ऑपरेटर खलील अहमदने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तथापि, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर, पथकाने परिसरात प्रवेश केला. पोलिसांनी मदशाची झडती घेतली . झडतीत आम्हाला एक मोठी तीन मजली इमारत आढळली. तिसऱ्या मजल्यावर तपासणी केल्यावर, आम्हाला बाथरूममध्ये ९ ते १४ वयोगटातील ४० अल्पवयीन मुली बंद आढळल्या.” अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. (Payagpur)

महिला पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने, मुलींना तात्काळ वाचवण्यात आले आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.मुलींच्या पालकांशी संपर्क साधून त्या मदरशाच्या विद्यार्थिनी होत्या का हे जाणून घेण्यात आले आहे. “मुलींना मदरशाच्या कामांसाठी ठेवण्यात आले होते की इतर काही कारणांसाठी हे पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर निश्चित केले जाईल. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि अधिकृत आदेशानुसार पुढील कार्यवाही केली जाईल,” असे पांडे म्हणाले. (Payagpur)

छापा टाकल्यालानंतर मदरसा संचालक खलील अहमद घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. छाप्यानंतर सुटका केलेल्या सर्व मुलींना त्यांच्या पालकांनी घेऊन गेले. या घटनेमुळे स्थानिक पातळीवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मदरसा संचालकाच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्याबद्दल रहिवाशांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, दशकापूर्वी एक लहान बूट-चिपाचे दुकान चालवणारा खलील आता या परिसरात तीन मजली इमारत आणि २४ दुकानांचा मालक आहे.काही गावकऱ्यांनी तर या प्रकरणाचा संबंध उत्रौलाच्या छंगूर बाबा प्रकरणाशी जोडला आहे. (Payagpur)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

मृत्युदंडाच्या शिक्षा अपिलात का टिकत नाहीत?