पुणे : प्रतिनिधी : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसज आणि कॉल करुन त्रास देणाऱ्या संशयिताला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अमोल काळे असे त्याचे नाव असून सध्या तो पुण्यात रहात आहे. तो मुळचा बीड जिल्ह्यातील परळी गावचा आहे. (Pankaja Munde)
महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्याच्याकडे नरिमन पॉईट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालय सोशल मिडिया समन्वयक निखिल भामरे यांनी तक्रार केली होती. संशयित काळे हा गेल्या काही दिवसापासून मुंडे यांना कॉल करुन आणि मेसेज करुन त्रास देत होता. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता च्या कलम ७८ आणि ७९ अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबधित तरतुदीसह काळे याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. (Pankaja Munde)
पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल ट्रेस करुन लोकेशन शोधून काढले. भोसरी पोलिसांनी अमोल काळेला अटक केली. त्याने मुंडे यांना कॉल करत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करुन चौकशीसाठी मुंबईत आणले आहे. संशयित अमोल काळे हा विद्यार्थी असून त्याने अश्लील भाषा का वापरली याचा पोलिस तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. (Pankaja Munde)
हेही वाचा :
शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांनी हात झटकले
सातबाऱ्यावरील कालबाह्य नोंदी हटवा