Ajit Pawar : शेतकरी कर्जमाफीवर अजित पवारांनी हात झटकले

Ajit Pawar

कोल्हापूर : प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन मी तरी दिले नव्हते, असा स्पष्ट करत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर हात झटकले. अजित पवार हे आज शुक्रवारी कोल्हापूरातील चंदगड तालुक्यातील एका कार्यक्रमास आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्जमाफीसंदर्भात वक्तव्य केले. (Ajit Pawar)

महायुती सरकारने सत्तेत येण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात जाहीरनाम्यात घोषणा केली होती. मात्र सत्तेत आल्यानंतर निधीचे कारण देत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. आज कोल्हापूर दौऱ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार आले होते. त्यांना पत्रकारांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी हात झटकले. ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन कोणी दिले होते?. मी दिले आहे का?, मी तर दिलेले नाही, असे सांगून कर्जमाफीच्या विषयाला बगल दिली. (Ajit Pawar)

लाडक्या बहिण योजनेचा हप्ता अद्याप बँकेत जमा झालेला नाही, यावर ते म्हणाले, लाडक्या बहिण योजनेच्या हप्तयाचे आम्ही नियोजन केले आहे. अदिती तटकरे यांनी त्यादृष्टीने नियोजन केले असून लाडकी बहीण योजनेस सर्वयोजनांचे पैसे देण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत अजित पवार यांना विचारले असता रायगडला पालकमंत्री दिले नाही म्हणुन काही अडले आहे का? सर्व कामे होत आहेत, असा दावाही त्यांनी केला. (Ajit Pawar)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर