इस्लामाबाद : पाकिस्तानच्या विमानतळ प्राधिकरणाने (पीएए) कराची आणि लाहोरच्या हवाई क्षेत्राचा काही भाग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे (पीएए)ने म्हटले आहे. ३१ मे अखेर हा निर्णय लागू राहील, असे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे.(Pakistan partially closes airspace)
पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात थेट कारवाईची भूमिका घेतली आहे. सिंधु पाणी करार रद्द करण्यासारखा निर्णय घेतला आहे. शिवाय पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निर्देश देत केंद्रीय गृहमंत्रालयाने अशा नागरिकांची यादी तयार करून त्यांची रवानगी तत्काळ पाकिस्तानात करण्याचे निर्देश दिले. शिवाय वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननेही भारतासाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र रद्द केले आहे. (Pakistan partially closes airspace)
दरम्यान, तिन्ही दलाच्या प्रमुखांबरोबर नुकत्याच झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननेही सावध पावले उचलल्याचे दिसते.
पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने (पीएए) जारी केलेल्या नोटीस टू एअरमेन (नोटम) मध्ये म्हटले आहे की या एफआयआरमध्ये हवाई क्षेत्राचे नियुक्त केलेले भाग संपूर्ण महिनाभर दररोज पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद राहतील.
सावधगिरी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे हवाई वाहतूक अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. व्यावसायिक उड्डाणे मात्र पर्यायी मार्गांनी सुरू राहतील, असे या नोटिसीत म्हटले आहे. (Pakistan partially closes airspace)
नियोजित उड्डाणांसाठी सुरळीत नेव्हिगेशन सुनिश्चित करण्यासाठी हवाई वाहतूक नियंत्रकांना सूचना देण्यात आल्या आहेत, परंतु पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स (पीआयए) ने ऑपरेशनल समायोजनाचा भाग म्हणून सहा राउंड-ट्रिप फ्लाइट रद्द केल्या आहेत.
यामध्ये इस्लामाबाद ते गिलगिट , इस्लामाबाद ते स्कार्दू, आणि गिलगिट ते इस्लामाबाद फ्लाइट्सचा समावेश आहे.
हेही वाचा :
देश संतापात, पंतप्रधान मनोरंजनात
पंकजा मुंडेना अश्लील मेसेज पाठवणारा अटकेत