Pak’s statement: सिंधू करारांतर्गत पाणी रोखणे युद्धजन्य स्थिती मानली जाईल

Pak’s statement

इस्लामाबाद : सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी वळवण्याचा किंवा थांबवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धजन्य स्थिती मानली जाईल, अशी दर्पोक्ती पाकिस्ताने गुरुवारी (२४ एप्रिल) केली. तसेच पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानने नाकारला. (Pak’s statement)

पहेलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या आणि राजनैतिक संबंध कमी करण्याच्या भारताच्या निर्णयावर देशाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी प्रमुख मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली.(Pak’s statement)

या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या (NSC) बैठकीनंतर निवेदन जारी करण्यात आले. त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला आणि त्यांच्या जनतेच्या सुरक्षेला कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याचा कठोर सामना करण्यात येईल. भारताने आपला संकुचित राजकीय अजेंडा पुढे नेण्यासाठी पहेलगामसारख्या घटनांचा वापर टाळावा आणि आरोप-प्रत्यारोप टाळावेत, अशा डावपेचांमुळे केवळ तणाव वाढतो आणि प्रदेशात शांतता आणि स्थैर्याच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.(Pak’s statement)

मंगळवारी (२२ एप्रिल) पहेलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी सीमापार संबंध असल्याने भारताने बुधवारी (२३ एप्रिल) १९६० चा सिंधू पाणी करार स्थगित केला. पाकिस्तानशी राजनैतिक संबंध कमी करण्याची घोषणा केली. त्यामध्ये त्यांच्या लष्करी सहकाऱ्यांची हकालपट्टी करण्याचा समावेश आहे.

  • पाकिस्तान म्हणतो…
  • सिंधू पाणी कराराअंतर्गत पाकिस्तानला मिळणारे पाणी वळवण्याचा किंवा थांबवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धजन्य स्थिती मानली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले आहे.
  • पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील लष्करी सल्लागारांना ३० एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले
  • पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी हवाई क्षेत्र रोखले, वाघा सीमा बंद केली.
  • पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय पाकिस्तानने नाकारला. तो २४ कोटी पाकिस्तानी नागरिकांसाठी जीवनरेखा असल्याचे म्हटले.
  • पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार स्थगित केला, ज्यामध्ये तिसऱ्या देशांमधून जाणारे मार्ग देखील समाविष्ट आहेत.
  • शीख यात्रेकरू वगळता सार्क व्हिसा सवलत योजनेअंतर्गत भारतीयांना दिले जाणारे व्हिसा निलंबित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.
  • सर्व भारतीय नागरिकांना शक्य तितक्या लवकर पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले.

    हेही वाचा :
    सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद
    दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू


Related posts

पवनराजे निंबाळकर हत्या खटल्यातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणातले आरोपी का सुटले?

भाजपला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी ऑपरेशन कमळ करावे लागेल : उद्धव ठाकरे