Three Naxals killed: तीन नक्षलवादी ठार

Representative

विजापूर (छत्तीसगड) : छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर गुरूवारी (२४ एप्रिल) सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. (Three Naxals killed)

छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यातील करेगुट्टा टेकड्यांवरील जंगलात सकाळी सुरक्षा दलांचे एक संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर होती. त्यावेळी ही चकमक झाली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

बस्तर परिसरात सुरू करण्यात आलेल्या बंडखोरीविरोधी सर्वांत मोठ्या कारवाईंपैकी एक असलेल्या या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक,  बस्तर फायटर्स, स्पेशल टास्क फोर्स, राज्य पोलिसांच्या सर्व युनिट्स तसेच केंद्रीय राखीव पोलिस दल  आणि त्यांच्या एलिट कमांडो बटालियन फॉर रिझोल्यूट अॅक्शन यांच्यासह विविध युनिट्समधील सुमारे १०,००० सुरक्षा कर्मचारी सहभागी झाले होते, असे त्यांनी सांगितले. (Three Naxals killed)

आतापर्यंत, चकमकीच्या ठिकाणाहून तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत आणि या भीषण गोळीबारात इतर अनेक माओवादीही मारले गेल्याचा संशय आहे, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईत तेलंगणा पोलिसही मदत करत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले.

माओवाद्यांच्या सर्वांत मजबूत गटातील बटालियन क्रमांक १ आणि माओवाद्यांच्या तेलंगणा राज्य समितीच्या वरिष्ठ म्होरके उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी ही कारवाई सुरू करण्यात आली आणि ती अनेक दिवस चालेल, असे त्यांनी सांगितले. घनदाट जंगल आणि टेकड्यांनी वेढलेला हा परिसर माओवाद्यांच्या बटालियन क्रमांक १ चा तळ मानला जातो, असेही त्यांनी सांगितले. (Three Naxals killed)

हेही वाचा :
गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी
दहशतवाद्यांना शोधून काढून अद्दल घडवू
हल्ल्यामागचा मास्टरमाइंड पाकिस्तानच

Related posts

फास्ट ट्रॅक न्यायालये म्हणजे जलद शिक्षा की जलद मुक्तता?

अन्न व औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटीत भ्रष्टाचार

लॉजमध्ये गर्भलिंग चाचणी; दोन एजंट महिलांना अटक