नवी दिल्ली : पहेलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्यांना शोधून काढू आणि त्यांनी कधी विचारही केला नसेल, अशी अद्दल घडवू, असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (२४ एप्रिल) दिला. २८ जणांचा बळी घेणाऱ्या पहेलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला. (Modi’s stern warning)
देशाला हादरवून सोडणाऱ्या पहेलगामधील हल्ल्याच्या घटनेनंतर मोदी यांची पहिलीच जाहीर सभा झाली. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. गुन्हेगारांवर निर्णायक कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
बिहारमध्ये राष्ट्रीय पंचायत राज दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहेलगाममध्ये दहशतवाद्यांनी देशातील निष्पाप लोकांची हत्या केली. या घटनेनंतर देश दुःखी आणि वेदनेत आहे. आम्ही पीडितांच्या कुटुंबांसोबत आहोत. दहशतवाद्यांना कसल्याही परिस्थितीत सोडणार नाही. त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.’’ (Modi’s stern warning)
त्यांना देण्यात येणारी शिक्षा अत्यंत कठोर असेल. त्यांनी याचा कधी विचारही केला नसेल, अशी ही शिक्षा असेल, असा इशाराही मोदी यांनी यावेळी दिला.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही भंग पावणार नाही. या हल्ल्यात मारले गेलेल्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. (Modi’s stern warning)
‘‘आज, बिहारच्या भूमीवर, मी संपूर्ण जगाला सांगतो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांच्या समर्थकांना ओळखेल, शोधून काढेल आणि शिक्षा करेल. आम्ही पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही,’’ असे पंतप्रधान म्हणाले.
‘‘दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय गप्प राहणार नाही. संपूर्ण राष्ट्राने हा संकल्प केला आहे. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत जे उभे राहिले त्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो,’’ असे ते पुढे म्हणाले. (Modi’s stern warning)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २८ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यात २६ भारतीय आणि दोन परदेशी पर्यटकांचा समावेश होता. त्यानंतर सरकारने पाकिस्तानचे सर्वोच्च राजदूत साद अहमद वॉरैच यांना बोलावून त्यांच्या लष्करी राजदूतांसाठी औपचारिक वैयक्तिकृत नॉन ग्राटा नोट सुपूर्द केली. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दहशतवाद्यांना निर्वाणीचा इशारा दिला.
थेट इंग्रजीतून भाषण विशेष म्हणजे बिहारमध्ये आयोजित या कार्यक्रमात हिंदीतून भाषण करत असताना पंतप्रधान मोदी यांनी अचानक इंग्रजीतून भाषण करायला सुरूवात केली. भारताच्या स्पिरिटवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही. बिहारच्या मातीत उभे राहून मी हे जगाला सांगू इच्छितो. भारत या दहशतवाद्यांना शोधून काढेल. त्यांना शिक्षाही देईल. पृथ्वीच्या अंतापर्यंत आम्ही त्यांचा माग काढू. भारताचे स्पिरिट आम्ही अशा दहशतवादी कृत्यांमुळे रोखणार नाही.”
हेही वाचा :
गौतम गंभीरला ठार मारण्याची धमकी
दहशतवाद, धर्म आणि राजकारण
सिंधू करार स्थगित, अटारी चेक पोस्ट बंद