Nitish Kumar Reddy : बुमराह उपलब्ध, रेड्डीला संधी ?

Nitish Kumar Reddy

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीसाठी जसप्रित बुमराह उपलब्ध आहे पण वर्कलोड व्यवस्थापनाचा भाग म्हणून बुमराहला मैदानावर उतरावयाचे की गोलंदाजी नितीश कुमार रेड्डीला संधी द्यायची याचा संघव्यवस्थापन गांभीर्याने विचार करत आहे.  बुधवारी दोन जुलै रोजी भारत दुसऱ्या कसोटीमध्ये एजबस्टनला यजमान इंग्लंडला भिडेल. (Nitish Kumar Reddy)

“जसप्रीत बुमराह उपलब्ध आहे पण तो हा सामना खेळेल की नाही याबद्दल आम्ही अद्याप निर्णय घेतलेला नाही,” असे भारताचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले. दरम्यान नितिश कुमार रेड्डीचा दुसऱ्या कसोटी सामन्यात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्याने नेटमध्ये चांगली गोलंदाजी करुन संघ व्यवस्थापनाला प्रभावित केले आहे. जर बुमराहला विश्रांती दिली तर त्याचा प्रवेश निश्चित आहे. “जसप्रीत बुमराह खेळण्यास तयार आहे, आम्ही शेवटच्या क्षणी तो निर्णय घेऊ. नितीश कुमार रेड्डी सामना खेळण्याच्या अगदी जवळ आहे. तो आमचा प्रीमियम फलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे,” असे डचमन पुढे म्हणाले. (Nitish Kumar Reddy)

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यापूर्वीच पुष्टी केली होती की बुमराह पूर्वनियोजित वर्कलोड व्यवस्थापन योजनेचा भाग म्हणून मालिकेतील पाचपैकी फक्त तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळेल.

जोफ्रा आर्चर सरावाला गैरहजर

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर सोमवारी इजबॅस्टन येथे झालेल्या संघाच्या सरावाला गैरहजर होता. कौटंबिक आपत्कालीन परिस्थितीमुळे तो उपस्थित राहिला नाही असे संघव्यवस्थापकांनी सांगितले. सध्या जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर असून तो संघात पुन्हा येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी डरहम विरुद्ध ससेक्ससाठी चार दिवसाच्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने १८ षटके गोलंदाजी करुन एक बळी मिळवला. गेल्या काही वर्षापासून वारंवार होणाऱ्या कोपराच्या दुखापती आणि पाठीच्या स्टेस फ्रॅक्चरशी तो झगडत आहे. आर्चरच्या कसोटी क्रिकेटमधील पुनरागमनाची चर्चा इंग्लंडच्या क्रिकेट वर्तुळात सुरू आहे. (Nitish Kumar Reddy)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर