नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ख्रिसमस सणाच्या दिवशी हवाई वाहतुकीस सुरुवात झाली. बेंगळुरुहून आलेले विमान सकाळी आठ वाजता उतरले. यावेळी पाण्याचे फवारे उडवून वॉटर सॅल्यूट देण्यात अला. तब्बल दोन दशकापूर्वी पाहिलेले स्वप्न आज साकार झाले. पण विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांचे नाव अजुनही न दिल्याने मराठी मनाला वेदना होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. (Navi Mumbai International Airport is operational)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन ८ ऑक्टोबर २०२५ रोजी झाले. त्यनातंर आज प्रत्यक्षात हवाई वाहतुकीस सुरुवात झाली. दिवसभरात ४० हून अधिक विमानांची ये जा होणार आहे. तसेच माल वाहतूक करणाऱ्यांच्या विमानांची वाहतूक सुरू होणार आहे. या विमानतळावर मुंबईतील छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल विमानतळ आणि सांताक्रुझ विमानतळावरील ताण कमी होणार आहे. महाराष्ट्रातील वस्तू, जीवनावश्यक वस्तूंची ने आण याच विमानतळावर होणार आहे. महाराष्ट्रात पिकणारे धन्य धान्य, फळे, दुग्धजन पदार्थांची वाहतूक या विमानतळावरुन होण्याची शक्यता आहे. (Navi Mumbai International Airport is operational)
या विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. त्यासाठी जनआंदोलनही उभारले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी तांत्रिक कारण देत दिबांचे नाव दिले जाईल असे आश्वासन देऊन आंदोलकांची बोळवण केली होती. त्याविरोधात भिवंडीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे आक्रमक झाले आहेत. भिवंडी ते नवी मुंबई अशी पदयात्रा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. पण महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्याने त्यांना आंदोलन मागे घ्यावे लागले. (Navi Mumbai International Airport is operational)