MVA’s protest: वारकऱ्यांची बदनामी; विरोधकांची निदर्शने

MVA’s protest

मुंबई : विशेष प्रतिनिधी : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री आपल्या अधिकारांचा गैरवापर करून राज्यातील जमिनी बळकावत आहे. सत्ताधारी मात्र वारीसारख्या हिंदू धर्मातील पवित्र मार्गाला अर्बन नक्षल म्हणून वारकऱ्यांना बदनाम करत आहेत, असा आरोप करीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी गुरुवारी (३ जुलै) जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. (MVA’s protest)

वारी आणि वारकऱ्यांबद्दल सत्ताधाऱ्यांच्या या अवमानकारक जुलूमशाहीविरोधात यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे परिसरात काहीकाळ गोंधळ निर्माण झाला होता. (MVA’s protest)

अधिवेशनाच्या चौथ्या दिवशीही विरोधकांनी पायऱ्यावर निषेध आणि घोषणाबाजी करत सरकारविरोधात आंदोलन केले. ‘घोटाळेबाज सरकारचा धिक्कार असो,’ ‘शेतकरी उपाशी, मंत्री तुपाशी,’ ‘वारकऱ्यांना अर्बन नक्षल म्हणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ ‘भूखंड लाटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो,’ ‘वारीला बदनाम करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा धिक्कार असो,’ ‘भूखंडाचा श्रीखंड खाणाऱ्या भ्रष्ट मत्र्यांचा धिक्कार असो,’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.

हेही वाचा :
 राणेंच्या मुलाने नाक घासून माफी मागावी : संजय राऊत
कुरिअर बॉयकडून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारुन अत्याचार

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

अनंत दीक्षित पुरस्कार पी. साईनाथ यांना तर अभिजीत करंडे यांना मोहन मस्कर पुरस्कार जाहीर