पुणे : प्रतिनिधी : कुरिअर बॉय असल्याचे भासवून युवतीच्या तोंडावर स्प्रे मारुन तिला बेशुद्ध करुन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. पिडितेवर अत्याचार केल्यानंतर संबधित युवतीच्या मोबाईलवर सेल्फी काढून ‘मी परत येईन’ असा मेसेजही नराधमाने टाकला आहे. पुण्यातील कोंढवा भागातील उच्चभ्रू सोसायटीत ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत. (Pune crime)
या घटनेची माहिती अशी की, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कोंढवा परिसरातील एका उच्चभू सोसायटीत संशयिताने कुरिअर बॉय असल्याचे सांगून प्रवेश मिळवला. घटनेच्यावेळी पीडिता घरी एकटीच होती. पीडित महिलेने कुरिअर माझे नाही असे स्पष्ट केल्यानंतर कुरिअर बॉयने सही तरी करावीच लागेल असे सांगून युवतीला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. (Pune crime)
युवतीने सेफ्टी दरवाजा उघडताच संशयिताने तिच्या तोंडावर स्प्रे मारुन तिला बेशुद्ध करुन तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर संशयिताने पीडितेचा मोबाईल घेऊन स्वत:चा सेल्फी काढला. तसेच मी परत येईन असा मेसेजही टाईप केला. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे. (Pune crime)
पोलिसांची दहा पथके त्याचा तपास करत आहेत. पीडीत युवतीला भावासमवेत रहात असून ती मुळची अकोल्याची आहे. ती कल्याणी नगरातील कंपनीत काम करत अशी माहिती पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी दिली. (Pune crime)