महाविकास आघाडीकडून विधानपरिषद निवडणूक जागावाटप जाहीर

MVA announces seat-sharing arrangement for Legislative Council elections

मुंबई : प्रतिनिधी : विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीतील तीन पक्षांचे १५ जागांवर एकमत झाले असून कोणता पक्ष कोणती जागा लढणार याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दोन जागांवर आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने दावा केला असून त्याबाबत नंतर निर्णय जाहीर करणार आहे. (MVA announces seat-sharing arrangement for Legislative Council elections)

आज शुक्रवारी महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडली. निवडणुकीसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत जागावाटप जाहीर केले. काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषदेत १७ पैकी १५ जागांवर तिन्ही पक्षांचे एकमत झाले असून नांदेड आणि नाशिकच्या जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला असल्याने त्याचा निर्णय नंतर जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.  (MVA announces seat-sharing arrangement for Legislative Council elections)

महाविकास आघाडीचे जागा वाटप असे

काँग्रेस : चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा-गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव-बीड-लातूर, पोटनिवडणूक असलेली लातूरची जागा काँग्रेस लढवणार आहे.

शिवसेना : रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजी या जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार आहे.

राष्ट्रवादी : पुणे, ठाणे, सातारा-सांगली या तीन जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढवणार आहे. (MVA announces seat-sharing arrangement for Legislative Council elections)

Related posts

मोदींच्या देखरेखीखाली नीट पेपरफुटी : राहूल गांधी

अल्पवयीन दुचाकी चालकाच्या पालकाला पंचवीस हजाराचा दंड

भर उन्हात शेताच्या बांधावर मनोज जरांगेचे आमरण उपोषण सुरू