नवी दिल्ली : सहा वर्षापूर्वी गलवानमध्ये वीस भारतीय सैनिकांनी बलिदान दिले. पण बलिदान विसरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला क्लिन चीट दिली आहे. आपल्या शूर सैनिकांनी हौतात्म पत्करले पण पण मोदी सरकारने भारताचे हित चीनकडे सोपवले आहे, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली आहे.
चीनकडून मोठ्या प्रमाणात आयात
खर्गे यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत भारताचे चीनवर आर्थिक अवलंबित्व वाढवत असल्याचा आरोप केला आहे. खर्गे यांनी एका मीडिया रिपोर्ट आणि अधिकृत व्यापार आकडेवारीचा हवाला देत दावा केला आहे की चीनमधून मोठ्या प्रमाणात औषध निर्माण, इलेक्ट्रिक वाहने आणि उर्जा क्षेत्रातील उद्योगासाठी आयात झाली आहे. (Modi government gives a clean chit to China)
भारत चीन द्विपक्षीय व्यापारी तूट ११२.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली
. गलवान संघर्षानंतर चीनकडून भारतात १०१.८१ टक्के आयात वाढली आहे. त्यामुळे भारत चीन द्विपक्षीय व्यापारी तूट ११२.१ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अँटिबायोटिक आयातीपैकी ८६ टक्के तर अक्टिव्ह फार्मास्युटिकल इंग्रेसिएंटस, बल्क ड्रग्ज, आयातीपैकी ७४ टक्के वाटा चीनचा आहे. भारतातील इलेक्ट्रिक वाहनांच्या सुट्या भागापैकी ६६ टक्के आयात चीनमधून होते. तर भारतीय ईव्हीएममध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीपैकी तीन चतुर्थांश बॅटरी चिनी बनावटीच्या आहेत. (Modi government gives a clean chit to China)
चार चिनी कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी
सरकारी वीज प्रकल्पासाठी चार चिनी कंपन्यांना बोली लावण्याची परवानगी देण्याच्या केंद्राच्या निर्णयावरही खर्गे यांनी टीका केली आहे. पंतप्रधान मोदीनी आपल्या ‘झुला मित्रा’साठी ‘लाल गालिचा’ अंथरला आहे अशी असा आरोप केला आहे.
चीन अरुणाचल प्रदेश, लडाखमध्ये भारतीय हद्दीत अतिक्रमण करत आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानच्या कारवाईत बिजिंगची भूमिका असल्याचे लष्कराच्या उपप्रमुखांनी मान्य केले आहे. तरीही भारत सरकार महत्वाचे उद्योग चीनला देत असल्याने भारताच्या राष्ट्रीय हिताला धक्का पोहोचला आहे. (Modi government gives a clean chit to China)