मंत्री माणिक कोकाटेंची शिक्षा कायम; आमदारकी, मंत्रीपद धोक्यात?

Minister Manik Kokate's conviction upheld

नाशिक : बनावट दस्तावेजाद्वारे अल्प उत्पन्न गटातून सरकारी कोट्यातील सदनिका बळकावल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावरील दोन वर्षाचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे मंत्री कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.  कोकाटे यांना अटक होणार का याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. शिक्षा कायम राहिली तर कोकाटे यांचे मंत्रीपद आणि आमदारकीही धोक्यात येऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे. (Minister Manik Kokate’s conviction upheld)

नशिक शहरातील उच्चभ्रू वस्तीत माणिकराव कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ विजय कोकाटे, पोपट सोनवणे, प्रशांत गोवर्धन या चौघांनी मुख्यमंत्री कोट्यातून अल्प उत्पन्न गटासाठीच्या सदनिका मिळवल्या होत्या. त्यानंतर दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोले यांनी तक्रार केली होती. जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटप व्यवहाराची चौकशी केली असता माणिकराव कोकाटे यांनी त्यांचे उत्पन्न जास्त असताना कमी दाखवल्याचे उघड झाले होते. या प्रकरणी प्रथम वर्ग न्यायालयाने कोकाटे बंधून दोन वर्षाचा कारावास आणि प्रत्येकी ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाच्या विरोधात कोकाटेंनी जिल्हा कोर्टात दाद मागितली असताना खालच्या न्यायालयातील शिक्षा कायम ठेवली आहे. त्यामुळे मंत्री कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Minister Manik Kokate’s conviction upheld)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर