दाट धुक्यामुळे अपघात, बसेसना आग, १३ ठार

13 killed in an accident on Yamuna Expressway

आग्रा :  उत्तर प्रदेशातील मथुरा जवळील यमुना एक्सप्रेसवर धुक्यामुळे झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ६० जण जखमी झाले. अपघातात अनेक बसेसना आग लागल्याने बसेस जळून खाक झाल्या. अपघातात सात बस आणि तीन कारचा समावेश होता. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेसवेच्या आग्रा नोएडा मार्गावर मंगळवारी पहाटे साडेचार वाजता अपघात झाला. यावेळी दाट धुके होते. कमी दृश्यमानतेमुळे अनेक वाहने एकमेकांवर आदळली. सुरवातीला तीन कार एकमेकांवर आदळल्या. त्यानंतर एक प्रवासी बस आणि सहा स्लीपर कोच बस एकमेकांवर आदळल्या. त्यामुळे सर्व बसेसना आग लागली. घटनास्थळी अग्निशमन दलच्या अकरा गाड्या दाखल झाल्या. त्यांनी आग आटोक्यात आणली, सुरुवातील चार मृतदेह बाहेर काढण्यात आले. (13 killed in an accident on Yamuna Expressway)

जखमी ६० प्रवाशांना विविध हॉस्पिटलमध्ये उपचारास दाखल करण्यात आले. अनेकांना भाजले असून त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, मथुरा जिल्हा दंडाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी अपघाताची दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले, तसेच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी  यांना कारणांचा अहवाल सादर करण्याचे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजनांची शिफारस करण्याचे काम सोपवले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या आपत्तीची त्वरित दखल घेतली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रत्येक मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आणि प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना पीएमएनआरएफकडून २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली. (13 killed in an accident on Yamuna Expressway)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी रोहित पवारांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

महिला आरक्षणात मागास महिलांसाठी तरतूद हवी