रणरणत्या उन्हात आमरण उपोषण करणार; मनोज जरांगेंची घोषणा

Manoj Jarange announces hunger strike

जालना : मराठा आरक्षाणसंदर्भात अनेक मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी ३० मे पासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दहा महिने वेळ दिली होती. पण सरकारने कोणतेच आश्वासन पूर्ण न केल्याने रखरखत्या उन्हात आमरण करणार आहे, अशी घोषणा जरांगे यांनी केली.

गेल्या आठवड्यात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटावयास पाठवले होते. त्यानंतर जरांगेंनी सात दिवसाची मुदत मागितली होती. ही मुदत संपल्यानंतर आज त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. (Manoj Jarange announces hunger strike)

पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “रखरखत्या उन्हात बाज टाकून मी कडक आमरण उपोषण करणार आहे. सरकारला आपली माया असती तर आतापर्यंत त्यांनी आरक्षण दिले असते. सरकारला अजून किती दिवस मुदत द्यायची? आमच्या लोकांच्या आयुष्याचा इथे उन्हाळा झाला आहे. कोणीही समाजबांधवांनी आंतरवालीकडे येऊ नये. आहे तसाच मी उपोषणाला बसणार आहे, त्यात मेलो तर मेलो. उष्माघाताने माझा जीव गेला तर त्याला सरकार जबाबदार असेल,” अशा इशारा त्यांनी यावेळी दिला. (Manoj Jarange announces hunger strike)

सरकारला मराठ्यांची मते पाहिजे आहेत. मराठ्यांना ५८ लाख कुणबी प्रमाणपत्रे कधी देणार असा सवालही जरांगे यांनी  सरकारला केला. बैठका, मोर्चे घेऊन गेले तरी आक्षण दिले नाही. आमच्यावर हल्ले करायचे आणि परत आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. ही दुटप्पी भूमिका कशासाठी घेतले जाते. मराठवाड्यात आम्हाला पाणी नाही. आरक्षण नाही. आम्ही काय चूक केली असा सवालही त्यांनी केला. (Manoj Jarange announces hunger strike)

Related posts

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या राजीनामा देणार?

वैभव सूर्यवंशीचे शतक हुकल्याने क्रिकेटशौकीन हळहळले

राज्यात जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू