वैभव सूर्यवंशीचे शतक हुकल्याने क्रिकेटशौकीन हळहळले

Vaibhav Suryavanshi missed out on a century

नवी दिल्ली : आयपीएलच्या एलिमेटरमध्ये सनरायझर्स हैद्राबादविरुद्ध कमी चेंडूत शतक ठोकण्याचा विक्रम नावावर करण्याच्या समीप असताना धडाकेबाज फलंदाज वैभव सूर्यवंशी ९७ धावांवर बाद झाल्यावर मैदानासह जगभर आयपीएल सामना पाहणारे क्रिकेट शौकिन हळहळले. (Vaibhav Suryavanshi missed out on a century)

वैभव सूयवंशीने २९ चेंडूत ९७ धावा ठोकून शतक ठोकण्याच्या तयारीत होता. प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर हल्ला करण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. प्रफुल्ल हिंगेने एक आखूड टप्प्याचा चेंडू टाकला. वैभवने थर्ड मॅनवरुन कट मारण्याचा प्रयत्न केला पण चेंडू सीमापार गेलाच नाही. स्मरण रविचंद्रनने पुढे धावत येत त्याचा उत्कृष्ट झेल टिपला. पाच चौकार आण् १२ षटकार त्याने ठोकला. त्याने आयपीएलमध्ये सर्वाधीक षटकार ठोकण्याचा ख्रिस गेलचा विक्रम मोडला. पण कमी धावात शतक ठोकण्याचा प्रयत्न त्याचा हुकला. बाद झाल्यानंतर मैदान सोडताना तो खूप निराश झाला होता. (Vaibhav Suryavanshi missed out on a century)

Related posts

राज्यात जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू

‘काँग्रेस’ची पंढरपूर वारीच्या कालावधीत ‘एसआयआर’  कार्यक्रम पुढे ढकलण्याची मागणी

मविआ विधान परिषदेच्या १७ जागा लढवणार : हर्षवर्धन सपकाळ