नाशिकच्या टीसीएस प्रकरणाचा एफआयआर सार्वजनिक करा : हर्षवर्धन सपकाळ

Make the FIR regarding the Nashik TCS case public

जमीर काझी :  मुंबई : नाशिकच्या टीएसएस प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक धृवीकरण करण्याचा खेळ भारतीय जनता पक्ष करत आहे. पोलिसांचा तपास  एफआयआर अद्याप सार्वजनिक केलेला नाही.  तो सार्वजनिक करून कायद्याने त्यांचे काम करावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी आज त्यांची  गांधी भवन येथे भेट घेतली. काँग्रेस पक्षाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांनी आभार मानले. यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी काळातील राजकीय वाटचालीबाबत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा झाली. राज्यातील लोकविरोधी तसेच संविधान आणि लोकशाहीविरोधी भाजप-महायुती सरकारच्या धोरणांविरोधात महाविकास आघाडी एकजुटीने आणि खंबीरपणे संघर्ष करत राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. (Make the FIR regarding the Nashik TCS case public)

 यावेळी पत्रकारांशी नाशिकमधील टीसीएसप्रकरणी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, या प्रकरणी एवढे दिवस पोलीस झोपा काढत होते का, याचे उत्तर द्यावे. या प्रकरणाचा तपास संशयास्पद आहे. या प्रकरणाला हवा देण्यात सरकारचा काही हात आहे का, हे उघड झाले पाहिजे. मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे करतो हा तमाशा बंद करा,  विनाकारण कोणाला गोवले गेल्यास काँग्रेस गप्प बसणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला. (Make the FIR regarding the Nashik TCS case public)

लवांडेवरील हल्याप्रकरणी कारवाई करा….. राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की व शिवीगाळ प्रकरणाचा  तीव्र शब्दात निषेध करून ते म्हणाले, ‘लवांडे हे वारकरी संप्रदायाचा समता, बुंधता व सामाजिक न्यायाचा विचार पुढे घेऊन जाणारे आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत आहे, ही चिंता त्यांनी व्यक्त केली होती, ती या हल्ल्याने खरी करून दाखवली आहे. या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा, मूठभर लोकांच्या हाती धर्मसत्ता व राजसत्ता असावी या विचाराचा मोठा फटका छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अनेक साधू संतांनाही बसला आहे. हा मनुवादी विचार भाजपा व रा. स्व. संघाचा आहे, याच विचाराने दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांनाही छळले आहे.  (Make the FIR regarding the Nashik TCS case public)

Related posts

पुण्यात हॉस्पिटलमध्ये टायमरसह बॉम्बसदृश्य वस्तूने खळबळ

तब्बल दहा दिवसानंतर केरळच्या मुख्यमंत्रीपदी सतीशन यांच्या नावाची घोषणा

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारणीतून पुन्हा प्रफुल्ल पटेल, तटकरेचा पत्ता कट!