नवी दिल्ली : तेलगू सुपरस्टार महेश बाबू याला रिअल इस्टेट कंपन्यांच्या मनी लाँड्रिंगप्रकरणात अंमलबजावणी संचालयनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. (Mahesh babu)
ईडीकडून साई सूर्या डेव्हलपर्स आणि सुराणा ग्रुप या दोन रिअल इस्टेट कंपन्यांनी केलेली कथित फसवणूक आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता प्रकरणात चौकशी सुरू आहे. सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेश बाबू यांना डेव्हलपर्सशी संबंधित प्रकल्पांना मान्यता दिल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. महेश बाबूने ५.९ कोटी रुपये शुल्क घेतल्याचे वृत्त आहे. या रकमेपैकी ३.४ कोटी रुपये चेकद्वारे देण्यात आले होते. उर्वरित २.५ कोटी रुपये रोख स्वरूपात मिळाले होते. ही रक्कम आता तपासात दिसून आली आहे. ही रोख रक्कम ही त्या समूहाच्या मनी लाँड्रिंगचा भाग असू शकते, असा ईडीला संशय आहे. (Mahesh babu)
तेलंगणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये, कंपन्यांवर अनधिकृत लेआउटमध्ये भूखंड विकून, एकाच भूखंडाची अनेकदा विक्री करून आणि बनावट नोंदणी हमी देऊन गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. अभिनेता महेश बाबूमुळे गुंतवणूकदारांमध्ये विश्वास निर्माण झाला. या कथित फसवणुकीबद्दल अनभिज्ञ असलेल्या खरेदीदारांना त्याने आकर्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. महेशबाबूचा मनी लाँड्रिंगमध्ये सहभाग नाही, पण ईडी फक्त त्याला मिळालेल्या रकमेसंबधी चौकशी करत आहे. कारण अधिकाऱ्यांनी १०० कोटी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांचे पुरावे जप्त केल्याचा दावा केला आहे. (Mahesh babu)
महेश बाबू सध्या एसएस राजामौली यांच्यासोबत त्याच्या पुढील चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. या महिन्याच्या सुरुवातीला निर्मिती सुरू झालेल्या या चित्रपटात प्रियंका चोप्रा देखील प्रमुख भूमिकेत आहे. (Mahesh babu)
हेही वाचा :
रामदेवबाबांची दिल्ली हायकोर्टाकडून कानउघाडणी
खून डोंगरावर, क्लू जयसिंगपूरमध्ये, आरोपी अथणीत