सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल अजिंक्य

Maharashtra High School wins Subroto Mukherjee Football Tournament

कोल्हापूर : पन्हाळा येथे  झालेल्या १७ वयोगट विभागीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूल, ज्युनिअर कॉलेज संघांने जिंकली. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर व जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर आणि संजीवन नॉलेज सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा खेळवण्यात आली. महाराष्ट्र हायस्कूल संघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. (Maharashtra High School wins Subroto Mukherjee Football Tournament)

स्पर्धेचा अंतिम सामना महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज  सांगलीच्या अप्पासाहेब बिरनाळे हायस्कूल यांच्यात झाला. महाराष्ट्र हायस्कूलने अप्पासाहेब बिरनाळे हायस्कूलचा ३-० असा पराभव केला. महाराष्ट्र हायस्कूलकडून सम्राट मोरबाळे ऋतुराज वीर राजवीर खराडे प्रत्येक एक गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

स्पर्धेतील अन्य सामन्याचा निकाल असा…  १. कोल्हापूर मनपा ( महाराष्ट्र हायस्कुल) विजय विरुद्ध रत्नागिरी जिल्हा (सेंट थॉमस स्कुल रत्नागिरी) ३-० कोल्हापूर कडून सम्राट मोरबाळे पृथ्वेश बागडीकर अर्णव शिंदे प्रत्येकी एक गोल

२. सांगली मनपा (अप्पासाहेब बिरनाळे स्कुल) विजयविरुद्ध सांगली जिल्हा (झिल इंटरनॅशनल स्कुल) २-० सांगली मनपाकडून सिद्धेश पाटील शौर्य शंकरवाला प्रत्येकी एक गोल.  

३. कोल्हापूर जिल्हा (संजीवन विद्यानिकेतन पन्हाळा) विजय विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा ( सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली ) ६-० कोल्हापुर कडून ऋषिकेश वाल्ले २, स्वराज सरनाईक २, धीरज कुरबेट्टी १, अविराज जाधव १ गोल.

पहिला उपांत्य सामना . कोल्हापूर मनपा विरुद्ध सातारा जिल्हा (सैनिक स्कुल सातारा) ४-० कोल्हापूर मनपा कडून सम्राट मोरबाळे, पृथ्वेश बागडीकर, ऋतुराज वीर, राजवीर खराडे प्रत्येक एक गोल

दुसरा उपांत्य सामना. सांगली मनपा विजयविरुद्ध कोल्हापूर जिल्हा २-१ गौतम पाटील, वरद मडीहल्ली तर कोल्हापूर कडून ऋषिकेश वाल्ले प्रत्येकी एक गोल

तृतीय स्थानासाठी लढत : कोल्हापूर जिल्हा विजय विरुद्ध सातारा जिल्हा ३-१ कोल्हापूर कडून आदिराज जाधव २, देवराज पवार १ तर सातारा कडून कुंदन कुमार १ गोल. (Maharashtra High School wins Subroto Mukherjee Football Tournament)

 विजयी संघातील खेळाडू असे

 अजय वडार, श्रीराम रजपूत, सार्थक विटेकर, वंश आगावणे, ऋतुराज वीर, सम्राट मोरबाळे, साईनाथ सुतार, केदार सोनाळे, साईराज पाटील, संचित उपलानी, संकेत जाधव, अर्णव शिंदे, श्लोक माळी, राजवीर खराडे, पृथ्वेश बागडेकर, श्रेयश धुमाळ.  क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे, व्ही. एस. पाटील, शरद मेढे, सूर्यजित घोरपडे, सतीश भोसले, संतोष पोवार. (Maharashtra High School wins Subroto Mukherjee Football Tournament)

Related posts

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणारा पोलिस निलंबित