कोल्हापूर : प्रतिनिधी : शहरस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत १७ वयोगट मुलांच्या गटात महाराष्ट्र हायस्कूलने तर मुलींच्या गटात कमला कॉलेजने विजेतेपद पटकावले. कोल्हापूर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आयोजित ही स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे सुरू आहेत. (Football Tournament)
१७ वयोगट मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने कोल्हापूर हायस्कूलवर ३-० असा विजय मिळवला. प्रथमेश बागडेकरने दोन तर हर्षवर्धन खवरेने एक गोल केला. तत्पुर्वी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात महाराष्ट्र हायस्कूलने प्रायव्हेट हायस्कूलचा ७-० असा धुव्वा उडविला. पृथ्वेश बागडेकरने चार , हर्षवर्धन खवरेने दोन तर श्रेयस पोवारने एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात कोल्हापूर हायस्कूलने सेंट झेवियर्स हायस्कूलला टायब्रेकरमध्ये २-० अशा गोलफलकाने हरवले. पूर्णवेळेत सामना शून्य गोलबरोबरीत होता.
बक्षीस वितरण उपसंचालक क्रीडा व युवा सेवा कोल्हापूर विभागाचे उपसंचालक सुहास पाटील यांच्या हस्ते झाले. विनय पाटील संचालक प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग यु आर अतकिरे मुख्याध्यापक महाराष्ट्र हायस्कूल विवेकानंद हिरेमठ कोल्हापूर हायस्कूल विजय माळी शैक्षणिक पर्यवेक्षक क्रीडा निरीक्षक सचिन पांडव कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन पदाधिकारी उपस्थित होते. (Football Tournament)
१७ वयोगट मुलींच्या अंतिम सामन्यात कमला कॉलेजने उषाराजे हायस्कूलवर १-०अशी मात केली. कमला कडून वैभवी कानडे गोल केला.
बक्षीस वितरण महानगरपलिका साहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी स्वाती दुधाणे, तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, उषाराजे हायस्कुल मुख्याध्यापक सौ. शोभा चौधरी, क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, कोल्हापूर सॉकर रेफ्री असोसिएशन सेक्रेटरी प्रदीप साळोखे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर महानगरपालिका मार्फत प्राथमिक शिक्षण समिती द्वारे करण्यात आलेले आहे. स्पर्धा नियोजनाचे कामकाज क्रीडा निरीक्षक सचिन पांडव, क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे सुरेश चव्हाण हे करत आहेत. विजयी, उपविजयी व तृतीय क्रमांक विजयी संघास राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू कै. अवधूत घारगे यांचे स्मरणार्थ श्री राजेंद्र घारगे यांचे कडून आकर्षक ट्रॉफी देण्यात आली
महाराष्ट्र हायस्कुल विजयी संघ : सक्षम साळोखे साईराज सुतार आर्यन साठे वीरेन पाटील वेदांत साळोखे राजवीर खराडे शिवराज तावडे प्रथमेश बागडीकर श्रीरंग प्रभू हर्षवर्धन खवरे श्रेयस पवार आयान मस्तानवाले शार्दुल ढोक विराज साळवी सोहम शिंत्रे यज्ञेश पाटील क्रीडा शिक्षक प्रदीप साळोखे व्ही एस पाटील मार्गदर्शक संतोष पवार शरद मेढे सूर्यजित घोरपडे
कमला कॉलेज विजयी संघ : युगंधरा चौगले संस्कृती तुरुके अवनी उत्तुरकर वैष्णवी पोवार नताशा पवार सायली देवणे सयोगिता शिंदे वैभवी कानडे श्रुती चौगुले गिरिजा विभुते अनुष्का पाटोळे गौरी जाधव क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील मार्गदर्शक स्नेहल सुतार. (Football Tournament)