विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणारा पोलिस निलंबित

Police officer suspended for threatening students with drugs

मुंबई : प्रतिनिधी : आंदोलनात ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांना ड्रग्जची धमकी देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे. पवन सांगळे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे अशी माहिती पुढे आली आहे. या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली होती. (Police officer suspended for threatening students with drugs)

जंतरमंतवरील कॉक्रोच जनता पार्टीच्या विद्यार्थी आंदोलनाला देशभर पाठिंबा मिळत आहेत. गावोगावी निदर्शने होत आहेत. मुंबईतही विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यांवर उतरले असून ते शांततेत आंदोलन करत आहेत. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची धरपकड सुरू आहे. आंदोलनातील ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांना पोलिसांच्या वाहनात बसवले आहे. त्यामध्ये तो पोलिस विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे. (Police officer suspended for threatening students with drugs)

विद्यार्थ्यांना धमकी देणारा पोलिस म्हणत आहे की, “या एरियामध्ये पुन्हा दिसलास तर माझ्यासारखा बेकार माणूस कोणी नाही. मी डायरेक्ट ५०-५० ग्रॅम पावडर खिशात टाकेन. मग गेलात तुम्ही. तुमचं आयुष्य गेलं पुर्ण.. नो जामीन… तुमच्यामुळे आम्हाला त्रास होत आहे.” पोलिसाच्या धमकीचा व्हिडिओ ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांन सोशल मिडियावर टाकला आहे. त्याच् पडसाद उमटले असून राज ठाकरे यांनीही त्यावर टीका केली आहे. पोलिसांकडे ड्रग कुठुण येणार. ते ड्रग् पेडलर आहेत का असा सवालही केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर पोलिस प्रशासनाने कारवाई केली आहे. (Police officer suspended for threatening students with drugs)

Related posts

वांगचुक यांचे उपोषण मागे; सीजीपी चे आंदोलन सुरूच राहणार

हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट थांबवा; हळदीची गुणवत्ता तपासा

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र हायस्कूल अजिंक्य