Local body elections without VVPAT : ‘व्हीव्हीपॅट’ शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका

Local body elections without VVPAT

नाशिक : महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणूकीत व्हीव्हीपॅट मशिन नसणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. मनुष्यबळ कमी पडणार असल्याने ऑक्टोबरनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले. (Local body elections without VVPAT)

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कामाचा आढावा घेऊन प्रशासनाला सूचना केल्या. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणूका एकत्रित घेण्यासाठी मनुष्यबळ कमी पडले. त्यामुळे टप्प्याटप्प्यानी निवडणूका घेतल्या जातील असे आयुक्त वाघमारे यांनी सांगितले. ऑक्टोबर अखेर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत व्हीव्ही-पॅट मिशन राहणार नाही, अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. (Local body elections without VVPAT)

वाघमारे यांच्या माहितीबद्दल विचारले असताना शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला आहे. हा निर्णय निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह लावणारा आहे असे मत व्यक्त अंधारे यांनी केले. व्हीव्हीपॅट गायब करण्यापेक्षा औपचारिकता म्हणून निवडणूकीचा जो फार्स करत आहात तो फार्स न केलेला बरा असेही त्या म्हणाल्या.  (Local body elections without VVPAT)

Related posts

मंत्री नितेश राणेंना एक महिना कारावासाची शिक्षा 

सरपंच आणि त्यांच्या मुलांकडून दहा हजार लाचेची मागणी

प्रस्तावित आय.टी.पार्कास महाराणी ताराराणी यांचे द्यावे; आमदार क्षीरसागर