BJP spokesperson becomes High Court judge: भाजप प्रवक्त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश !

BJP spokesperson becomes High Court judge

मुंबई : प्रतिनिधी : दोन वर्षापूर्वी भाजप प्रवक्त्या राहिलेल्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.  या नियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेताना सत्ताधारी पक्षाची प्रवक्ता म्हणून बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणे म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वात मोठ आघात आहे असे व्टिट केले आहे. (BJP spokesperson becomes High Court judge)

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजियमने २८ जुलै रोजी मंजूर केलेल्या प्रस्तावानुसार मुंबई उच्च न्यायालयात तीन नवीन न्यायाधीशांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये आरती साठे यांचे नाव आहे. या नियुक्तीवर रोहित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. सार्वजनिक व्यासपीठावरून सत्ताधारी पक्षाची बाजू मांडणाऱ्या व्यक्तीची न्यायाधीश म्हणून नेमणूक होणं म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात आहे. याचा भारतीय न्याय व्यवस्थेच्या निःपक्षपणावर दूरगामी परिणाम होईल. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना न्यायाधीश म्हणून नेमणं म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. (BJP spokesperson becomes High Court judge)

जेंव्हा उच्च न्यायालयातील न्यायाधीश पदावरील व्यक्ती राजकीय पार्श्वभूमी आणि सत्ताधारी पक्षातील पदाचा उपभोग घेतलेली असेल तेंव्हा न्यायदानाची प्रक्रिया राजकीय आकस बाळगून होणार नाही, याची खात्री कोण देणार? एका राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीने पुर्ण न्यायदानाच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही का? असा प्रश्न रोहित पवार यांनी सोशल मिडियावर विचारला आहे.

सदरील नियुक्त व्यक्तीच्या पात्रतेबाबत कुठलाही आक्षेप नाही, परंतु संबंधित व्यक्तीची नियुक्ती करताना ‘न्यायदान हे सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही अभिनिवेशाशिवाय असते’ या सामान्य माणसांच्या भावनेलाच आघात बसत आहे. परिणामी संबंधित राजकीय व्यक्तीची न्यायाधीश पदावरील नियुक्तीबाबत पुनर्विचार करावा. आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनीही याबाबत मार्गदर्शन करायला हवं. अस रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत प्रश्न केला आहे. (BJP spokesperson becomes High Court judge)

रोहित पवार यांच्या पोस्टला भाजपने उत्तर दिले आहे. भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलं आहे की, रोहित पवारजी सार्वजनिक जीवनात आरोप करताना थोडी माहिती घेऊन आरोप करावा. उठसूठ खोटे आरोप करू नयेत. आरती साठे यांनी ६ जानेवारी २०२४ रोजी भाजप प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता. यासंदर्भातील पत्र भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारजी यांना दिलं होतं. सोबत हे पत्र जोडत आहे. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार प्रसिद्धीसाठी तुम्ही करू नका. उघडा डोळे बघा नीट! असे भाजपकडून आमदार रोहित पवारांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (BJP spokesperson becomes High Court judge)

Related posts

शरद पवार दिल्लीत कशासाठी हवेत?

संकटाच्या गर्तेतून राष्ट्रवादी काँग्रेस कशी मार्ग काढणार?

Jaysingrao Pawar मराठ्यांचा इतिहास लखलखीत करणारे संशोधक