कोल्हापूर मेडिकल असोसिएशन आयोजित वैद्यकीय परिषदेत डॉ. अनंत जोशींचे व्याख्यान

Lecture by Dr. Anant Joshi at the KMA medical conference

कोल्हापूर : प्रतिनिधी :  कोल्हापूर मेडिकल असोसिएशन शाखा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने दरवर्षी केएमए कॉन २०२६ या दोन दिवसीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन हॉटेल सयाजी येथे करण्यात आले आहे. २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या परिषदेत मुंबईतील प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनंत जोशी यांचे व्याख्यान होणार आहे, अशी माहिती कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.ए .बी पाटील, परिषदेच्या अध्यक्षा डॉ. गौरी  साईप्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली. परिषदेस देशभरातून ६०० डॉक्टरांची उपस्थिती असणार आहे. (Lecture by Dr. Anant Joshi at the KMA medical conference)

    अवघा रंग एक (One Community , One Vision) या ब्रीदवाक्यावर आधारित या परिषदेकरता मुंबईतील सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ.अनंत जोशी हे ‘ स्पोर्ट्स मेडिसीन आणि इजा वीरहित व्यायाम’ या विषयावर आणि मुंबई येथील योग तज्ञ रूपा चक्रवर्ती ” योग ” विषयावर लोक जनजागृती पर व्याख्यान होणार आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता हॉटेल सयाजी येथे  व्याख्यान होणार आहे. (Lecture by Dr. Anant Joshi at the KMA medical conference)

परिषदेचे उद्घाटन शनिवारी द २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता होणार असून अतिरिक्त पोलीस महासंचालक बेंगळुरू येथील हेमंत निंबाळकर आणि सोलापूरचे नामांकित हृदयरोग तज्ञ डॉ. गुरुनाथ परळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.परिषदेमध्ये ए आय वर्कशॉप आणि विविध व्याख्यानांमार्फत तज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबईतील नामांकित डॉ. रॉय पाटणकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. केएमएच्या वतीने दिला जाणारा डॉ.अतुल जोगळेकर जीवन गौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ पोटविकार तज्ञ डॉ. विवेकानंद कुलकर्णी यांना देण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम रविवारी दुपारी बारा वाजता होणार आहे. दरम्यान परिषदेत  गर्भावस्थेपासून बालपणापर्यंत कोणती काळजी घ्यावी,संधिवात, मधुमेहामधील आहार, यकृताचे आजार , राष्ट्रीय अतिदक्षता विभागाचा कोल्हापूरमध्ये विकास, स्तंभन दोष, चष्म्यातून मुक्ती, रक्तविकार, मेंदूविकार अशा अनेक विषयांवर चर्चा आणि तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

पत्रकार परिषदेस डॉ. संदीप पाटील,  सचिव डॉ.अर्जुन अडनाईक, खजानीस डॉ. प्रवीण नाईक , डॉ. दिलीप पाटील,डॉ. आर.एस. पाटील,डॉ. विजय गावडे,डॉ. अश्विनी पाटील आदी उपस्थित होते. (Lecture by Dr. Anant Joshi at the KMA medical conference)

Related posts

८३ वर्षीय वर्षा गगराणी यांच्या १४ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह

न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताचा विजय