खासदार श्रीकांत शिंदेंच्या मार्फत जरांगेंना ५०० कोटी?

500 crores for Jarange through MP Shrikant Shinde

जालना : प्रतिनिधी : “जरांगे पाटील यांना ५०० कोटी रुपये पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदेमार्फत पैसे दिले आहेत” अशा संवादाची ऑडीओ टेप मराठा क्रांती मोर्चाचे मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेची ऐकवली. अर्धा तासांच्या टेपमध्ये अनेक खळबळजनक गोष्टी बाहेर आल्या असून या ऑडीओची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दखल घ्यावी. ऑडिओचा तपास करुन दोषींना काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवावे अशी मागणी जरांगेंनी केली आहे. (500 crores for Jarange through MP Shrikant Shinde?)

मनोज जरांगे यांनी दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने ५०० कोटी रुपये घेतल्याचा खळबळजनक आरोप केला होता. जरांगेंच्या आरोपानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तुमच्याकडे पुरावे असतील तर ते सादर करावेत असे प्रतिआव्हान जरांगेंना दिले होते. हे आव्हान स्वीकारत जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऑडिओचे पुरावे ऐकवले.

मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्यासाठी षढयंत्र

भाजपच्या एका कोअर टीममधील एका ऑनलाईन बैठकीची ही ऑडिओ टेप आहे. त्यामध्ये एक महिला म्हणते, “जरांगे पाटील यांना ५०० कोटी पोहोचले आहेत. श्रीकांत शिंदेच्यामार्फत पैसे दिले आहेत. आता जरांगे विधानसभेत आमच्या फायद्याचे राहतील की राहणार नाही याबाबतचे माझे मत वेगळे आहे” असे मत संबधित महिलेने व्यक्त केले. संबधित महिला हिंदीतून बोलत होती.  या ऑडिओ क्लिपवर बोलताना जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाचे आंदोलन चिरडण्यासाठी आपल्याविरोधात षढयंत्र सुरू आहे. मला किती त्रास होत असेल हे तुम्हालाही कळेल. पैसे दिले नाही, घेतले नाही, मग षढयंत्र का रचत असा सवालही त्यांनी केला. चर्चा करणारी मंडळी धोकादायक असून या प्रकरणांचा मुख्यमंत्र्यांनी छडा लावावा, अन्यथा तेही सहभागी असतील असा आरोप केला. (500 crores for Jarange through MP Shrikant Shinde?)

जरांगे भाजपला मराठाद्रोही ठरवत आहेत

या ऑडिओमधून जरांगेंचा प्रभाव कसा कमी करायचा. त्यासाठी वैयक्तिक स्तरावर फंड कसा उभारायच याचे संवाद आहेत. जरांगेच्या विरोधात रणनिती आखताना एक व्यक्ती स्पष्टपणे म्हणत आहे की “जरांगे भाजपला मराठाद्रोही ठरवत आहेत आणि त्याचा प्रभाव समाजावर पडत आहे. प्रविण दरेकर, नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांचे बोलणे बाजूला ठेवू. शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना बोलत केले पाहिजे. भाजपमधील मराठा चेहऱ्यांनी समोर येऊन जरांगेंना उत्तर दिले पाहिजे” असे म्हटले आहे. जरांगेंच्या विरोधात रसद पुरवण्याचा आणि त्यांच्याविरोधात गट तयार करण्याचा कट रचला जात असल्याचे दिसते.

जरांगेविरोधात बोलणाऱ्यांना रसद?

जर कोणी जरांगेंच्या विरोधात उघडपणे बोलायला तयार असेल तर त्यांना भेटवावे. पार्टीचा फंड वापरायचा नसेल तर वैयक्तिक लोकांनी स्वत: चा फंड वापरावा. त्याचे प्रपोजल द्यावा. त्यांच्या वाहनांचा आणि मोर्चाचा खर्च उचलावा. सोशल मिडिया कंटेट क्रिएशनवर चर्चा करण्यापेक्षा त्यांना सरळ सक्रिय करुन जरांगेंना डॅमेल करण्याची प्रक्रिया सुरू करावी असे मुद्दे या मिटिंगमध्ये मांडण्यात आले. शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंच्याबद्दल वाईट शब्दात टिप्पणी केली आहे. (500 crores for Jarange through MP Shrikant Shinde?)

Related posts

८३ वर्षीय वर्षा गगराणी यांच्या १४ पुस्तकांचे प्रकाशन संपन्न

जलसंवर्धन, नदी पुनरुज्जीवन आणि पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज : डॉ. राजेंद्र सिंह

न्यूझीलंडच्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत भारताचा विजय